पांडूरंग बजाज शो रूम मध्ये 400व्या इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू स्कूटर चे वितरण उत्साहात संपन्न.


 पांडूरंग बजाज मध्ये पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू स्कूटरचे 400व्या वाहनाचे  वितरण उत्साहात संपन्न..-श्री यशोवर्धन राहुल उत्पात.

पंढरपूर, प्रतिनिधी 

  देशातील दुचाकी निर्मिती करणाऱ्या  यशस्वी आणि  दर्जेदार  अग्रगण्य बजाज ऑटो या कंपनीने नव्या युगाला साजेल  अशी 

पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू, स्कूटर ची रेंज खास ग्राहकांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून दिली आहे. याच रेंजमधील 

 बजाज चेतक 2901ब्ल्यू या इलेक्ट्रिक स्कूटर चे  400व्या गाडीचे वितरण पांडूरंग बजाज शो रूम मध्ये उत्साहात संपन्न झाले.

यावेळी प्रोप्रायटर यशोवर्धन उत्पात, व्यवस्थापक आदित्य खिस्ते, सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिषेक, स्टोअर मॅनेजर वर्षा, सर्व्हिस इंजिनीयर विशाल, टेक्निशियन बालाजी आदी उपस्थित होते.

अल्पावधीतच ही स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून शहर व परिसरात चारशे स्कूटर्स रस्त्यावर दिसून येत आहेत.

अशी माहिती पंढरपूर येथील बजाज कंपनीचे डीलर पांडुरंग बजाज चे प्रोप्रायटर श्री यशोवर्धन राहुल उत्पात यांनी   दिली.

बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर 2020पासुन भारतीय रस्त्यांवर धावत आहे कंपनीने त्याच रेंज मध्ये नवीन 

चेतक ब्ल्यू 2901हे  मॉडेल बाजारपेठेत आणले असून गाडीची एक्स शो रूम किंमत 99998एवढी आहे. रेसिंग रेड, अझुर ब्ल्यू, सायबर व्हाइट, ब्रुकलाईन ब्लॅक, लाइम यलो या विविध आकर्षक पाच रंगात ही गाडी उपलब्ध आहे.

केंद्र शासनाकडून सूरू असलेली सबसिडी दि 30सप्टेंबर रोजी बंद होणार असून या गाडीची किंमत 10हजार ने वाढणार आहे.

त्यामुळे ग्राहकांची मागणी प्रचंड वाढली आहे.

खास लोकग्रहास्तव 7990असे सहज परवडणारे डाऊन पेमेंट असून केवळ अर्ध्या तासात बजाज कंपनीकडून केवळ आधारकार्डवर 

 आथिर्क सहाय्य  मंजुर होते.

3300एवढा मासिक हप्ता असून इसबावी येथील आर व्हीं शॉपिंग सेंटर येथील ए  सी सुसज्ज शो रूम मध्ये एक्सचेंज सुविधा आहे.

खास लोकाग्रहास्तव या गाडीला मेकॅनिकल की दिलेली असुन एका चार्जिंग मध्ये ही गाडी 123किमी धावू शकते. यासाठी केवळ तीन युनिट वीज लागते. या गाडीची मोफत टेस्ट राईड घेऊन  या पर्यावरणपूरक वाहनाचा, पेट्रोल खर्च बचतीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री यशोवर्धन राहुल उत्पात यांनी केले आहे.

जून्या गाडीची योग्य किंमत देऊन गाडी बदलून मिळणार आहे.

या गाडीच्या माऊथ टू माऊथ पब्लिसिटी मुळे केवळ 8महिन्यात 400चेतक स्कूटर ची विक्री झाली आहे. सदर गाडीला 5वर्षे/70हजार किमी पर्यंत वॉरंटी आहे.कंपनीची विश्वासार्हता आणि गाडीची गुणवत्ता याने सिद्ध होते.

कंपनी मार्फत विशेष ट्रेनिंग घेऊन चार इंजिनीयर विक्री पश्चात सेवा देत आहेत.

तसेच प्रथमच रोड साईट असिस्टंस सर्व्हिस वर्षभर मोफत मिळणारं आहे,

म्हणजे रस्त्यात कोठेही गाडी बंद पडली तर जागेवर येऊन वाहन घेऊन जाणार असल्याची सुविधा आहे.

     दुसऱ्या वर्षानंतर नाममात्र शुल्क आकारून विक्री पश्चात सेवा दिली जाईल. चेतक मध्ये प्रीमियम, अर्बन आणि ब्ल्यू अशी रेंज ग्राहकांच्या निवडीसाठी उपलब्ध आहे.

या गाडीला 2.9किलो व्हॅट बॅटरी असून गाडीचा कमाल वेग 63की मी प्रती तास आहे. रिव्हर्स गियर गाडीत असून महिलांना हे खूपच उपयुक्त आहे.

     आधिक माहितीसाठी आदित्य 8600024807, वर्षा,8600024804  यांच्याशी संपर्क साधावा.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.