आषाढी यात्रेत चुकलेले 1400भाविक शहर पोलिसांच्या सतर्कतेने नातेवाईकांच्या ताब्यात.
आषाढी यात्रेत चुकलेले १४०० भाविक शहर पोलिसांच्या सतर्क कामगिरीमुळे नातेवाईकांच्या ताब्यात.
पंढरपूर प्रतिनिधी -
यंदाच्या आषाढी वारीत पंधरा लाखांच्या वर भाविक पंढरपूर येथे आले होते.
यामुळे गर्दीत भाविक, नातेवाईक हरविण्याचे प्रमाण मोठे होते.
यात्रा कालावधीत १५०० बक चुकले होते. या भाविकांच्या चाईकांचा शोध घेऊन १४०० कांना नातेवाईकांच्या स्वाधीन यात आले असल्याची माहिती या पथक प्रमूख पोउनि मोनिका पाटील यांनी दिली.
पढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी या भाविकांना मठ, मंदिर, बाळा, बस स्थानक, रेल्वे स्थानक, लेल्या व्यक्तीचा शोध घेणे व इतर ने देण्यासाठी पंढरपुर शहरात
तिर्थक्षेत्र पोलीस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, गौतम विद्यालये, बस स्थानक, स्वा. सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, कॉलेज चौक, कराड नाका, वाळवंट आदी ठिकाणी माहिती केंद्रे सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी २४ तास सेवा देण्यात येत होती. चुकलेल्या व्यक्तीची नोंद घेउन शोध घेण्याचे काम स्वयंसेवक करीत होते. माहिती केंद्राचा लाभ हजारो भाविकांना झाला. पोलीसांकडून योग्य माहिती मिळत असल्याने भाविकांतून समाधानं व्यक्त करण्यात आले.
आषाढी यात्रा कालावधीत १५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसर, वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन
रोड आदी परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती.
गर्दी असल्याने यात्रा कालावधीत १५०० भाविक चुकले. मदत केंद्रात दाखल झालेल्या चुकलेल्या व्यक्तींना पोलीसांकडून चहा, बिस्कीटे, भोजन देण्यात आले. माहिती विचारून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. पोलीस व स्वयंसेवकांनी चुकलेल्या १४०० भाविकांच्या नातेवाईकाचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केले. यामुळे भाविक, नातेवाईकातून समाधान व्यक्त करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पो. नि. विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक व तिर्थक्षेत्र पोलीसांनी यात्रा कालावधीत भाविकांना सुविधा दिली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment