सांगली येथे लोकसभा क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत लोकसभा कोअर कमिटी बैठक संपन्न.


 "पुन्हा एकदा भाजपा सरकार" - लोकसभा क्लस्टर हेड मा.आ.प्रशांत परिचारक 

प्रतिनिधी पंढरपूर - 

सांगली येथील लोकसभा कोअर कमिटी बैठक क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान,  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पणाने काम करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.

या दरम्यान लोकसभा कार्यालय उभारणी, वॉर रूम, संघटनेच्या स्तरावर बूथ समिती, पन्ना प्रमुख , विस्तारक प्रवास, विविध मोर्चा, सेल प्रकोष्ठ यांच्या नेमणुका, तसेच सुपर वरियर तपासणी याची माहिती घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षाने दिलेले विविध अभियान, गाव चलो अभियान  या विषयी आढावा घेतला.

मोदी सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णयाचा प्रसार आणि प्रचार या बाबत देखील उपस्थितांसोबत चर्चा केली., सोबतच पक्ष संघटना, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय व मतदार संघाची एकूण राजकिय सामजिक परिस्थितीची माहिती घेतली.

याप्रसंगी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नाम.सुरेश (भाऊ) खाडे, कल्स्टर प्रमुख माजी  आमदार प्रशांत परिचारक, सह कल्स्टर सहप्रमुख आमदार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक विधानसभा निहाय संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. 

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दिपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील,  विलासराव जगताप, प्रदेश सदस्या निता केळकर, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सत्यजीत देशमुख, शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक, जत विधानसभा निवडणूक प्रमुख रवि तम्मनगौंडा पाटील, पै.पृथ्वीराज पवार, मोहन वणखंडे, डॉ.सरीता कोरबु, डॉ.उषाताई दशवंत, ब्रम्हानंद पडळकर, मिलींद कोरे, विलास काळेबाग बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.