सुप्रसिध्द योग शिक्षिका सौ ज्योती शेटे यांची भा ज पा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्षपदी निवड.


 पंढरपूर भा ज पा महिला मोर्चा अध्यक्ष पदी सौ ज्योती शेटे यांची निवड.

प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर येथील सुप्रसिध्द महिला योग शिक्षिका सौ ज्योती अविनाश शेटे यांची भा ज पा महिला मोर्चा शहरअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


  यावेळी  भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ मंगला वाघ , प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे, लोकसभा समन्वयिका सुनीला शहा यांच्या उपस्थितीत त्यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. ज्योती शेटे योग साधनेच्या माध्यमातून आणि ज्योतिर्मय निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून समाजाशी अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडलेले आहेत अतिशय सुस्वाभावी सर्व महिलांना समवेत घेऊन जाणाऱ्या अशा व्यक्तीची या पदावर ती निवड झाल्यामुळे  महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नियुक्ती नंतर सौ ज्योती शेटे म्हणाल्या, भा ज पा हा शिस्तबध्द आणि संस्कारी पक्ष आहे,

महिला आणि मुलीमध्ये  आत्मविश्वास जागवून त्यांना आत्मनिर्भर आणि स्वबळावर उभे करण्यासाठी कार्य करू, 

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम, राबवू असे त्यांनी सांगितले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.