कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्राचार्य कैलाश करांडे यांचा सत्कार.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने , एस. के .एन. इंजि. कॉलेजचे प्राचार्य .कैलास करांडे यांचा सत्कार संपन्न!
प्रतिनिधी.- पंढरपूर- रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य कैलाश करांडे यांना औरंगाबाद येथे त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. यानिमित्त पंढरपूर येथील कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा गुरु लान्स औरंगाबाद येथे
दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. २०२२-२३ या रोटरी वर्षा मधील सर्व क्लब आणि रोटरी क्लब सदस्य यांच्या साठी असणारा महत्वाचा हा समारंभ होता.
यामध्ये रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष रो कैलास करांडे सर यांच्या यशस्वी कारकिर्दीत रोटरी क्लब पंढरपूर ला २०२२-३३ या वर्षीच्या भरीव कामगिरीबद्दल
१. बेस्ट क्लब पुरस्कार
२. बेस्ट प्रेसिडेंट पुरस्कार
३. बेस्ट रायला पुरस्कार
४. बेस्ट मेम्बरशिप डेव्हलपमेंट पुरस्कार
५. बेस्ट एफर्टस फॉर डिस्ट्रिक्ट कॉन्फरेन्स पुरस्कार
६. बेस्ट पार्टीसिपेशन इन न्यू जनरेशन ऍक्टिव्हिटी पुरस्कार
७. बेस्ट टेकनोसवि क्लब पुरस्कार हे सात पुरस्कार प्राप्त झाले.
रोटरी क्लब पंढरपूरच्या इतिहासात
रो डॉ कैलास करांडे यांनी एक नवीन पान समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करांडे सरांचा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांचे हस्ते महाजन फूडस् येथे सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरीतील नामवंत अभियंता राजेंद्र माळी यांचाही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंडळाचे खजिनदार ज्ञानेश्वर मोरे म्हणाले की, ७वर्षापूर्वी कलासाधना परिवाराच्या वतीने करांडे सरांना नॅक कमिटीने ए प्लस श्रेणी दिली होती म्हणून विशेष गुणवत्ता पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. तेव्हा पासून सरांच्या मागे पुरस्कारांची श्रुंखला अविरत सुरु आहे. यावेळी मंडळाचे सदस्य राजकुमार शहा, अभिराज बडवे, डॉक्टर किरण बहिरवाडे, प्रा. राजेंद्र मोरे, महेश अंबिके, अमरसिंह चव्हाण, अक्षय बडवे पाटील, प्रा. प्रसाद परिचारक सर, रणजीत पवार, राजेंद्र माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंह चव्हाण सर यांनी केले तर आभार रणजीत पवार यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment