जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार.- रियाज मुलाणी.

*जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल,त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार.रियाज मुलाणी* 

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने जुनी पेन्शन पुन्हा मिळावी यासाठी येथील रखुमाई सभागृह येथे रविवार दि.१० सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना (शिंदे गट) नेते महेश साठे, डी वी पी उद्योग समूहाचे अमर पाटील, पोलिस उपनिरीक्षक हमीद शेख, माजी जि प अध्यक्षा वैशाली सातपुते  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जुनी पेन्शन संघटना तालुका अध्यक्ष रियाज मुलाणी म्हणाले, जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल,त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार.

आज आपल्या जुन्या लढ्यासाठी आपण पेन्शन फायटर एकत्र आलो आहोत. अनेकांनी रक्ताचे पाणी करून फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्यूइटी मिळविली .

आता आपल्याला जुन्या पेन्शन साठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

श्री विठ्ठल कृपेमुळे कोणाही मंत्र्याला भेटायला मंत्रालयात जाण्याची गरज नाही, तर आख्खे मंत्रिमंडळ श्री विठ्ठलाच्या पायाशी लोळण घेत असते.

माहितीच्या अधिकारात आपण शासनाला जाब विचारत असून एन पी एस मध्ये होत असणारा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार थांबवा , तोटा कसा होत आहे,हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.यावेळी ७० सदस्याचे जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध मान्यवर, तज्ञ लोकांची जुन्या पेन्शन मागणीसाठी भाषणे झाली. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 

यावेळी रियाज मुलाणी, श्री सुरेश इंगोले, श्री मयूर कोळी, वनिताताई बंगाळे, स्वातीताई गवळी, सुनंदाताई बेडेकर, प्रकाश तोटेवाड, विकास बढे, अविनाश बुरांडे,  अमरजाताई काळे, राणीताई शंकर, चंद्रकलाताई कदम,  व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

 

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.