सहा वर्षांपूर्वी पत्नीचा खून करून फरार असलेल्या पतीस केले जेरबंद.


 सहा वर्षापासून खुन करून फरार झालेल्या आरोपीला पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीसांनी केले जेरबंद.

पंढरपूर (प्रतिनिधी) सहा वर्षापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणाऱ्या आरोपी पतीस तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. सहा वर्षांपूर्वी 

दिनांक १३ जुलै २०१६ रोजी मौजे गार्डी, ता. पंढरपूर येथील भागुबाई भाउसो अडगळे, (वय ३५ )वर्षे यास त्याचा पती  भाउसाहेब भानुदास अडगळे याने त्याचे पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून तीस कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी करुन तिस ठार केले होते.

 व मयताची आई सोडवण्यास आली असता तीलाही आरोपीने कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत  दादु मारुती केंजळे, वय ५० वर्षे, रा. पळशी, ता. पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पंढरपुर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजि. नंबर ४४५/२०१६ भा. दं. वि. कलम ३०२, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयातील आरोपी  भाउसाहेब भानुदास अडगळे, रा. गार्डी, ता. पंढरपूर हा गुन्हा घडले पासून मागील ६ वर्षापासून अद्यापर्यंत फरार होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये फरार आरोपीचा शोध घेणे कामी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, डॉ. अर्जुन भोसले व पोलीस निरीक्षक श्री. मिलींद पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील अंमलदार यांना योग्य सुचना देवुन सदर आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार हे त्याचा शोध घेत होते. परंतू तो मिळून येत नव्हता. शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे अंमलदार यांना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी नामे भाउसाहेब अडगळे हा गार्डी गावामध्ये आहे अशी बातमी मिळाल्याने गोपनीय बातमीदाराच्या बातमी प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी गार्डी गावात जावून त्यास ताब्यात घेतले.

 तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी ही . शिरीष सरदेशपांडे , पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण  . हिंमत जाधव सो, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, डॉ. अर्जुन भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व  मिलींद पाटील, पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इरफान शेख, पोलीस नाईक सज्जन भोसले, • हणुमंत शिंदे यांनी केली असून त्याबाबत पुढील तपास पोसई . वडणे, पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.