कैद्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न .


 कैद्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न.

पंढरपूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीतर्फे वेळोवेळी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर कारागृह येथे  कैद्यांसाठी कायदेविषयक  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       सदर आयोजीत शिबीरात कैद्यांना त्यांच्या असणाऱ्या हक्क व कर्तव्याची जाणीव करण्यासाठी तसेच विधी सेवा समिती मार्फत कैद्यांच्या लाभाविषयीची माहिती देण्यासाठी न्यायाधीश पी.पी. बागुल यांच्या अध्यक्षतेखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर शिबीरास पंढरपूर बार असोसिएशनचे  अध्यक्ष अर्जुन पाटील,  नायब तहसिलदार मनोज  श्रोत्री, विधीस्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर, नंदकुमार देशपांडे, पांडुरंग अल्लापूरकर, अंकुश वाघमोडे तसेच  न्यायालयीन कर्मचारी वाय. डी. बोबे, के. के. शेख, विशाल ढोबळे, श्रीकांत भोरे, श्री बागल व श्री सुरवसे उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

९४०३८७३५२३. 

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.