दामाजी कारखान्यावर आ आवताडेयांनी २०० कोटी कर्ज केल्याच्या वावड्या अहवालातून गायब.

*दामाजी कारखान्यावर आ आवताडेंनी २०० कोटी कर्जाचा डोंगर केल्याच्या वावड्या अहवालातून गायब*


*समविचारीच्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाटला - सुरेश भाकरे*


पंढरपूर (प्रतिनिधी ) 

दामाजी कारखाना चालवताना कारखान्यावर १९८ कोटीचे कर्ज केले असून कारखाना डबघाईला आणला आहे. तरी कारखाना वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या असा खोटा प्रचार करत आवताडे यांच्या हातून समविचारी आघाडीने कारखाना काढून घेतला होता. मात्र नुकताच प्रसिद्ध झालेल्या कारखान्याच्या अहवालामध्ये या 200 कोटी कर्जाचा कुठेही उल्लेख दिसून आला नसून समविचारी आघाडीने केलेले आरोप हे धादांत खोटे असल्याचे त्यांनी स्वतःच सिद्ध केले असल्याचे दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना सुरेश भाकरे म्हणाले की, सध्या दामाजी कारखान्यावर सत्तेमध्ये असलेल्या समविचारी आघाडीने खोटेनाटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतली असली तरी कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत. समाधान आवताडे यांनी कारखान्यावर २००कोटीचे कर्ज केले असून ते यापुढे कारखाना चालवू शकणार नाहीत असा अपप्रचार केला होता, मात्र समाधान आवताडे यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये कारखान्यावर फक्त ७५ कोटीचे कर्ज असल्याचे सांगितले होते ते सांगताना २०१६ साली कारखाना आवताडे यांच्या हात्ती येताना कारखान्यावर १४५कोटी रुपये कर्ज होते. त्यातील ७० कोटी कर्ज फेडल्याचे ते वारंवार सांगत होते. त्याचबरोबर जिल्ह्यात दोन नंबर वर रिकव्हरी ठेवली होती. नुसत्या साखर उत्पादनावर कारखाना सुरू असताना सहा वर्षे कारखाना व्यवस्थित चालविला, चालू संचालक मंडळाला अजून थकीत पगार देता आला नाही, दहा रुपयानेच साखर देणार असे म्हणत कारखान्याचे सभासद वाढ केली, स्वस्तात साखर मिळतेय या आशेने सभासदांनी दहा हजार रुपयांनी शेअर्स भरले यातून कारखान्याला दहा कोटी रक्कम गोळा केली व दहा रुपये किलोचे साखर वीस रुपये किलो करून दहा किलो साखरही कमी करत सभासदांचा विश्वासघात केला आहे, त्याच बरोबर सभासदांचा अपघाती विमाही बंद केला आहे यावरून चालू संचालक मंडळाचे निर्णय सभासद विरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

आमच्या संचालक मंडळाने प्रतिदिन दोन लाख लिटर क्षमता असलेल्या डिस्टलरी प्रकल्पाच्या सर्व परवानगी घेतल्या होत्या मात्र विद्यमान संचालक मंडळाला पुढे काहीच  करता आले नाही. प्रचारात कामगार पतसंस्थेचं देणं दिल नाही, म्हणून सांगणा-यांनी सत्ता आल्यावर किती देणी दिली? कामगारांच्या ब्रेकचा कालावधी वाढवून काही संचालकांच्या मर्जीतील कामगारांना कामावर बोलविले व प्रामाणिक व कष्टकरी गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आणली. आमचे संचालक मंडळाच्या काळात मशिनरी मेंटेनन्स वरती सहा वर्षात १० ते १२ कोटी खर्च केला होता. या संचालक मंडळाने आवघ्या एक वर्षात १२ ते १४ कोटी खर्च केलेची चर्चा असून, या खर्चाला आडकाठी करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचेही बोलले जात आहे. त्याच बरोबर चालू संचालक मंडळाला निवडणुकीमध्ये मदत केलेल्या “सजग नागरिक संघाचे” पदाधीकारी मशिनरी पार्ट खरेदीच्या जादा बिले आकारलेले खात्री झाले नंतर बिलाची खातरजमा करण्यासाठी एक ते दोन वेळा कारखान्यावर गेले असता त्यांनाही टाळाटाळीचे उत्तरे देऊन पारदर्शी कारभाराचा नमुना दाखवलेची चर्चा आहे.

आ.आवताडेंचे काळातील संचालक मंडळाने वैयक्तिक मालमत्तेवर कर्ज काढून कारखाना व्यवस्थित चालविला सध्याच्या संचालक मंडळाच्या काळात कुणाचा कुणाला ताळमेळ असल्याचे दिसत नसून, सताधारी संचालक मंडळाने कर्ज कमी करण्या पेक्षा वाढवल्याचेच अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे आहवालात दाखवलेला नफा कितपत खरा आहे यावर प्रश्न उपस्थित होत असून सभासदांनी निवडून दिलेले कारभारी नीट कारभार करतात का? हे अहवाल वाचून सभासदांनी ठरवीत वेळच्या वेळी जाब विचारणे गरजेचे आहे.


फोटो – सुरेश भाकरे 


कोट

*गोरगरीब सभासदांना सुरू असलेला अपघाती विमा चालू संचालक मंडळाने बंद केला असून तो विमा सुरू करून सभासद शेतकऱ्यांना आधार द्यावा तसेच सणासुदीला १० रुपये किलोने साखर देत गरिबांचे संसार आम्ही गोड केले होते मात्र या संचालक मंडळाने २० रुपये किलो दर करून ६० किलोची साखर ५० किलो केली आहे तेही पूर्ववत करावे. बाकी कोण खरे कोण खोटे हे अहवालातून स्पष्ट झाले असून कारखाना कुणी चांगला चालविला याचे मूल्यमापन आगामी काळात सभासदच करतील.*

आ समाधान आवताडे.

संपादक

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

 

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.