Posts

Showing posts from March, 2025

पंढरपूर येथील सरकारी दवाखाना पुन्हा सुरू, आ. अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

Image
 *पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत* (आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ) पंढरपूर प्रतिनिधी /- अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, रा.पा कटेकर, किरणराज घाडगे, विक्रम शिरसट,नागेश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते. १०० वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर नगरपालिकेचे हॉस्पिटल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते.  आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत पंढरपूर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेचे हाॅस्पिटल बंद असल्याच्या तक्रार केल्याने आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा  करून नगरपालिकेचे हाॅस्पिटल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हाॅस्पिटल सुरू झाल्याने पंढरपूर शहर व परिसरात आनंदाचे वातावरण झाले आहे. यातूनच हजारो...

आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून अरळी येथे २२कोटी २२लाख रुपयांच्या विकासकामास सुरुवात.

Image
 आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर २२ कोटी २२ लाख निधी विकास कामांचे अरळी येथे भूमिपूजन संपन्न  प्रतिनिधी-अरळी येथे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या अरळी बंधारा २२कोटी २२ लाख निधी व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरवेळी आमदार समाधान आवताडे यांनी गुढीपाडवा व हिंदू नववर्ष या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत नरसिंह प्रभुचे दर्शन घेऊन सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना केली. रात्रीचा-दिवस करून निवडणुकीत अरळी गावातील अनेक सहकाऱ्यांसोबत जेष्ठांनी देखील मीच उमेदवार आहे असा प्रचार करून मतदारसंघातील कानाकोपऱ्यात पोहचले. तुम्ही सर्वांनी कष्ट घेऊन मला आमदार' म्हणून काम करण्याची संधी दिलीय याची जाणीव आणि जबाबदारी कायम ठेवून आपणा सर्वांच्या विकासासाठी व गावाच्या धोरणात्मक वैभवासाठी मी नेहमी बांधील राहून आपली सेवा करेन असे अभिवचन आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त करून कृतज्ञता मांडली. यावेळी माजी जि.प.सदस्य बापूराया उर्फ सिद्धू चौगुले, उपसभापती रमेश भांजे, संचालक अशोक केदार, जगन्नाथ कोकरे चनबसू येणपे,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली परिचारक कुटुंबाची सांत्वनपर भेट.

Image
  मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट  पंढरपूर दिनांक 29(प्रतिनिधी): - माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते. तरी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.        यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते. संपादक. चैतन्य उत्पात.

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर.

Image
 *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनिम्मित आज रक्तदान शिबिर. प्रतिनिधी पंढरपूर _ शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर शनिवार दि२९मार्चरोजी श्री संत दामाजी मठ, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडे आठ ते पाच वाजेपर्यंत शिबिर होणार आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० जयंती  संत शिरोमणी नामदेवरयांचे ७५५ जयंती वर्ष आणि ६७५ वा समाधी सोहळ्याचे वर्ष आहे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना  जलसमाधी सोहळा ल्या ४२५ वर्ष झाली.  ४२६ सोहळा काल नाथ षष्ठी ला झाला.* नाथ महाराजांना भागवत लिहून ४५२ वर्ष पूर्ण झाली जगतगुरु संत श्री तुकाराम महाराजांचे  ३७५ वा वैकुंठ गमन सोहळा नुकताच झाला. यासर्वांचे औचित्य साधून या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे. रक्तदात्यास श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने १७ संतांची चरित्र भेट देण्यात येणार आहेत. अशी माहिती श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने देण्यात आली. संपादक. चैतन्य उत्पात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरीत.

Image
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरीत. पंढरपूर  (प्रतिनिधी) पंढरपूर येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीस तसेच पंढरपूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिचारक यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.  मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच पंढरपूर येथे येत असून प्रशांत परिचारक यांना ते भेटणार आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केवळ फडणवीस यांच्या शब्दा खातर आ. समाधान आवताडे यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त राजकीय वर्तुळात तसेच परिचारक समर्थकात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

भाजप च्या वतीने पंढरीत आ. रोहित पवार यांचा जाहीर निषेध.

Image
 *रोहित पवारांना त्वरित अटक करा.. माऊली हळणवर. *कट रचुन बहुजन समाजातील नेत्यांवर खुनी हल्ला घडवुन सुपारी देऊन महिलेला पुढे करून बदनामी करत अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणार्या रोहित पवाराची एस आय टी चौकशी करून अटक करण्यात यावी या करता बहुजन समाजाच्या वतीने पंढरीत आंदोलन. पंढरपूर (प्रतिनिधी)  पंढरपूर येथे शुक्रवार दि.२८मार्च रोजीछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोहित पवारांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले , सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दहा वर्षांपूर्वीची कोर्टाने निकालात काढलेली केस उकरून काढत महिलेला सुपारी देऊन एका पत्रकाराला हाताशी धरून रोहित पवार यांनी कट रचून बदनामीचे षडयंत्र रचल्याचे विधान भवनांमध्ये रेकॉर्ड वरती माहिती देण्यात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं तसेच काल-परवा विधानभवनाच्या पत्रकार कक्षामध्ये आमदार गोपीचंद पडळकर व महादेव देवकते या तरुणाने शरद पवारांचा टॅटू दाखवत गोपीचंद पडळकर यांचा खून करण्याची सुपारी किंवा तसे षडयंत्र रोहित पवार यांचे असल्याचे सर्व मीडियासमोर सांगितले म्हणून आज पंढरपुरातील बहुजन बांधवांच्या वतीने छत्रपत...

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावण्यात यावा. आ. अभिजीत पाटील.

Image
 *दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावावा आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात उठवला आवाज* (त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न) प्रतिनिधी/-  माढा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन सभागृहामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले असता त्यावर आमदार अभिजीत पाटील यांनी आवाज उठवला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेण्यात आली. दूध आणि तस्सम अन्नपदार्थातील भेसळ मानवी आरोग्याला घातक आहे त्यामुळे अशी भेसळ करणारा मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यकता सुधारणा करण्यात येतील त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बैठकीत दिले. राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ॲनालॉग चीज हा पदार्थ अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याची तक्रार आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण ...

ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा._आ.समाधान आवताडे.

Image
 *प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुन्हा नवीन घरकुलांचे सर्वेक्षण..!*  मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.... आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन. पंढरपूर  (प्रतिनिधी) एक एप्रिल पासून राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ सुरू होणारा असून मतदारसंघातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या योजनेमध्ये आपली नोंदणी करावी ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्यामार्फत ही नोंदणी होणार असून यामध्ये काही अडचणी आल्यास किंवा जाणून-बुजून कुणी कोणाच्या सांगण्यावरून राजकीय दबावातून एखाद्या पात्र लाभार्थ्याला वगळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला केले आहे . पहिल्या टप्प्यातील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया येत्या १ एप्रिल २०२५ पासून ग्रामपंचायतीच्या मदतीने सुरु होत आहे. या योजनेपासून मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी तात्काळ संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. प्रध...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन तराफा नष्ट.

Image
 अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ३तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट पंढरपूर :(प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. २६ मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आसबे मळा येथे असणार्‍या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या ३थर्माकोल तरापा नष्ट करण्यात आल्या आहेत. या  कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, संतोष सुरवसे .ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे, अनिल बागल, सरताज मुजावर, गणेश पिसे, रविकिरण लोखंडे, लोकरे, तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संपादक. चैतन्य उत्पात

डॉ बसवराज सुतार यांच्या अद्यावत ज्ञानाचा उपयोग पंढरपूर कर नागरिकांनी करून घ्यावा._श्री उमेश परिचारक.

Image
 डॉ. बसवराज सुतारांच्या अद्यावत ज्ञानाचा पंढरपुरकरांनी उपयोग करुन घ्यावा..... उमेश परिचारक! पंढरपूर  (प्रतिनिधी)  डॉ बसवराज सुतार यांच्या अद्यावत ज्ञानाचा उपयोग पंढरपूर येथील नागरिकांनी करून घ्यावा असे प्रतिपादन उमेश परिचारक यांनी केले.पंढरपूर येथील डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केयर या हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण व्हावी या उदात्त  हेतूने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी परिचारक बोलत होते.  परिचारक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, एनजोग्राफी, एन्जोप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी यासाठी पूर्वी सोलापूर, पुणे, मुंबई येथे जावे लागत होते पण डॉ. सुतारांच्या अद्यावत ज्ञानाने ती उणीव भरुन निघाली आहे. डॉ. सुतार आपल्या भाषणात म्हणाले की, मागील वर्षभरात पंढरपुरकरांनी अलोट प्रेम दिले. त्यांच्या प्रेमामुळे पुढे अजून अत्याधुनिक सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असेन.  कलासाधना  अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी सुतार डॉक्टरांचा वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्...

माझा पुरूषोत्तम काका.

Image
 *माझा पुरूषोत्तम काका* *अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।* *देहान्ते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर॥* देवा मला सहजपणे मृत्यू येऊ दे. माझं जीवन दैन्यरहित असू दे. आणि मृत्यू नंतर मला तुझेच सानिध्य मिळू दे. असा या श्लोकाचा अर्थ आहे.  माणूस जन्माला आल्या वर त्याच्या मृत्यू निश्चित असतो. पण वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अगदी सहज मृत्यू येण्यासाठी खरोखरच उदंड सुकृत लागतं!! जन्मोजन्मीचं पुुण्य लागतं. ते माझ्या पुरूषोत्तम काकाचं होतं. ..  माझ्या पितृतुल्य पुरूषोत्तम काकाला अगदी असाच मृत्यू आला. अगदी श्लोकात सांगितल्याप्रमाणे!! त्याचं पूर्व सुकृत आणि या जन्मी कमावलेल्या पुण्याची जमा पुंजी इतकी काठोकाठ होती की मृत्यू देखील त्याला शरणागत होऊन आला. आदले दिवशी रात्रीसाडेनऊ वाजेपर्यंत सहजपणे गप्पा मारणारा माझा काका सकाळी साडेपाच वाजता या जगात नसतो हे सत्य पचवणं मला आजही अवघड जातं आहे. डोळ्यांनी सत्य दिसतंय पण मन मात्र ते मानत नाही अशी अवस्था आहे.  माझा अतिशय निर्मळ मनाचा, पापभिरू, गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतल्याने रामाची निरतिशय भक्ती करणारा, सज्जन, दुसऱ्यांच्या मदतीला तत्पर...

कट्टर हिंदुत्व आणि विवेकाचा अनोखा संगम म्हणजे अभयसिंह . ह भ. प चैतन्य महाराज देगलूरकर.

Image
 कट्टर हिंदुत्व व विवेकाचा अनोखा संगम म्हणजे अभयसिंह यांचे व्यक्तीमत्व:ह.भ.प.चैतन्यमहाराज देेगलुकर हिंदुत्ववादी नेते अभयसिंह इंचगावकर कुलकर्णी यांच्या एकसष्ठी गौरव सोहळा व ग्रंथतुला पंढरपूर (प्रतिनिधी) कट्टरता आणी विवेक एका ठिकाणी असत नाहीत असे म्हणतात मात्र अभयसिंह यांच्या कडे कट्टर हिंदुत्वा बरोबरच विवेक यांचा अनोखा संगम अभयसिंह यांच्या व्यक्तीमत्वात आहे. त्यांचा व्यासंग व अभ्यास मोठा असल्याने ते हिंदुसमाजासाठी अधिक सक्षमपणे  काम करु शकले असे प्रतिपादन निरुपणकार ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलुकर यांनी केले.हिंदुसभानेते अभयसिंह इचगावकर यांचा एकसष्ठी निमित्त सौ.वसुजा यांचेसह सपत्नीक सत्कार करण्यात आला,या प्रसंगी ,त्रिंबकेश्वर येथील महामंडलेश्वर देवबाप्पा तथा फरशीमहाराज,जेष्ठ हिंदुत्ववादी गोरक्षक मिलींद एकबोटे,हिंदु एकता आंदोलनाचे नेते हिरामणआप्पा गवळी,सुप्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ.गुरुनाथ परळे,मराठा महासंघाचे नेते दास शेळके,प्राचार्य आशाताई शिंदे,महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभेचे अध्यक्ष अनिलराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. चैतन्यमहाराज बोलताना पुढे म्हणाले लहानपणापासून मी अभयसिं...

आ. समाधान आवताडे यांनी दिली अचानक उप जिल्हा रुग्णालयास भेट, प्रशासनास योग्य नियोजन नसल्याने दिली तंबी.

Image
 आ. समाधान आवताडे यांनी दिली अचानक उप जिल्हा रुग्णालयास भेट, प्रशासनास योग्य नियोजन करण्याच्या सूचना.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शनिवार दि२२मार्च रोजी अचानक येथील उप जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णांकडून समस्या जाणून घेऊन रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले रुग्णांना त्वरीत उपचार करण्यासाठी तंबी दिली. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक गैरसोय आहेत. उपचाराकरिता दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांना शौचालय, स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून नागरिकांशी असभ्य वर्तणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान तेथील रुग्णांनी आमदार समाधान अवताडे यांच्यासमोर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामधील असुविधांचा पाढाच वाचला. अनेक पीडित रुग्णांनी आम्ही जखमी आहोत. आमच्यावर योग्य पद्धती उपचार...

स्वेरीच्या ज्ञानेश्वरी कांबळे यांची महा पारेषण मध्ये निवड.

Image
 स्वेरीच्या ज्ञानेश्वरी कांबळे यांची महापारेषण मध्ये निवड पंढरपूर(प्रतिनिधी)- कोरोना कालावधीत आलेली संकटे त्यातून परिवाराची संघर्षात्मक पार्श्वभूमी आणि या सर्व संकटांवर मात करण्यासाठी पाठीशी उभे राहिलेले स्वेरीचे डॉ.रोंगे सर! या सर्व बाबी जीवनाचे सर्व गणित बदलण्यास कारणीभूत ठरल्या. होय! डॉ. रोंगे सरांच्या बहुमोल मार्गदर्शनाला परिश्रमाची जोड मिळाली आणि हाताला नोकरी नावाचे ‘चवदार फळ’लाभले. खरंच हे सर्व अविश्वसनीय वाटते ना? ग्रामीण भागातील एक मुलगी चक्क महापारेषण मधील नोकरीला गवसणी घालते, ही बाब पंढरपूर पंचक्रोशीतच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याला आत्ता कौतुकास्पद बनली आहे.            आढीव (ता.पंढरपूर) येथील ज्ञानेश्वरी सज्जन कांबळे यांना दहावीला ९२ टक्के आणि १२ वीला ७० टक्के मार्क्स मिळाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे सोलापूरात स्थायिक असलेले मामा लक्ष्मण यशवंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भविष्याचा विचार करून ज्ञानेश्वरी हिला गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरीमध्ये तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे ठरवले. २०१९ मध्ये तिने स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वि...

स्वेरीतील विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा._सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे.

Image
 स्वेरीतील विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा                                                                 - सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे स्वेरीच्या ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ मध्ये पालक मेळावा संपन्न पंढरपूर- (प्रतिनिधी)‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमांतूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, इंग्रजी संभाषण कौशल्य, उत्तम सादरीकरण अशा करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये कमालीची वाढ होते. विद्यार्थ्यांमध्ये झालेला हाच गुणवत्तापूर्ण बदल ‘कार्पोरेट सेक्टर’ क्षेत्रात पदोनत्तीसाठी उपयोगी ठरतो.’ असे प्रतिपादन टीसीएस कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे यांनी केले.           गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्...

स्वरगंध कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा, गानरसिक मंत्रमुग्ध.

Image
 पंढरीतील गान रसिक स्वर तुषरानी चिंब, स्वरगंध या कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी स्वर चैतन्य संगीत समूह यांच्या वतीने आयोजक व मार्गदर्शक श्रीहरी कुलकर्णी आणि सौ शर्मिला देशपांडे यांनी अनोख्या स्वरसागरात पंढरपूरकर गान रसिकांना स्वरगंध या कार्यक्रमात स्वर तुषारानी चिंब भिजविले. सुरुवातीला डॉ प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाइस चेअरमन सौ माधुरी जोशी, सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पंढरपूर येथील आरती प्रांगण येथे गुरूवारी सायंकाळी ही सूरमयी      वाट उत्तरोत्तर रंगत गेली. गाण्याची आवड असलेले पण हौशी गायकांनी हृदयापासून सादर केलेली गानकला  रसिकांना सुखावून गेली. जुन्या, नव्या बहारदार हिंदी चित्रपटातील गीतांनी भूतकाळाच्या रम्य रमणीय काळात अनेकजण गेले. या कार्यक्रमात हौशी गायक कलाकारांनी, दो लब्जो की है दिल की कहानी, हे धी ग्रेट गॅबलर , जाने जा ढूंढता फिर रहा हुं तुम्हे रात दीन मैं  यहाँ से वहा, आजा शाम होने आयी, शान मधील प्यार करनेवाले प्यार करते है शान स...

स्वरगंध कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा, गानरसिक मंत्रमुग्ध.

Image
 पंढरीतील गान रसिक स्वर तुषरानी चिंब, स्वरगंध या कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी स्वर चैतन्य संगीत समूह यांच्या वतीने आयोजक सौ शर्मिला देशपांडे यांनी अनोख्या स्वरसागरात पंढरपूरकर गान रसिकांना स्वरगंध या कार्यक्रमात स्वर तुषारानी चिंब भिजविले. सुरुवातीला डॉ प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाइस चेअरमन सौ माधुरी जोशी, सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पंढरपूर येथील आरती प्रांगण येथे गुरूवारी सायंकाळी ही सूरमयी      वाट उत्तरोत्तर रंगत गेली. गाण्याची आवड असलेले पण हौशी गायकांनी हृदयापासून सादर केलेली गानकला  रसिकांना सुखावून गेली. जुन्या, नव्या बहारदार हिंदी चित्रपटातील गीतांनी भूतकाळाच्या रम्य रमणीय काळात अनेकजण गेले. या कार्यक्रमात हौशी गायक कलाकारांनी, दो लब्जो की है दिल की कहानी, हे धी ग्रेट गॅबलर , जाने जा ढूंढता फिर रहा हुं तुम्हे रात दीन मैं  यहाँ से वहा, आजा शाम होने आयी, शान मधील प्यार करनेवाले प्यार करते है शान से, आशा मधील मेघा रे मेघा रे, तेजाब...

सामाजिक वन विभागाचा मंगळवेढा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार._आ.समाधान आवताडे.

Image
 सामाजिक वन विभागाचा मंगळवेढा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार..! पंढरपूर (प्रतिनिधी)  तक्रार करणाऱ्या सरपंचाला वन क्षेत्रपालाची दमदाटी आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला अधिवेशनात प्रश्न प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील दहा हेक्टर वन क्षेत्रावर ११हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट तयार करून त्याचे अंदाजपत्रक ही तयार केले त्या झाडांना पाणी देण्यासाठी टेंडर एकाच्या नावे करून प्रत्यक्ष पाणी वाटप नऊशे रूपये प्रति टँकर याप्रमाणे दुसऱ्याला दिले प्रत्यक्षात लागवड दोन ते अडीच हजार झाडेच लावली पाणी फक्त वृक्ष लागवड करतानाच घातले त्यानंतर तीन वर्षे काही झाडे पावसाच्या पाण्यावर जगली यासंदर्भात डोनज गावच्या सरपंचाने या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी तक्रार केल्यास तुमच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करीन असा दम दिला त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करणार का? असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान उपस्थित करून मंगळवेढ्यातील वनविभागाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. सध्या सुरू असलेल्या अध...

स्वरगंध कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.

Image
 पंढरीतील गान रसिक स्वर तुषरानी चिंब, स्वरगंध या कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी स्वर चैतन्य संगीत समूह यांच्या वतीने आयोजक सौ शर्मिला देशपांडे यांनी अनोख्या स्वरसागरात पंढरपूरकर गान रसिकांना स्वरगंध या कार्यक्रमात स्वर तुषारानी चिंब भिजविले. पंढरपूर येथील आरती प्रांगण येथे गुरूवारी सायंकाळी ही सूरमयी      वाट उत्तरोत्तर रंगत गेली. गाण्याची आवड असलेले पण हौशी गायकांनी हृदयापासून सादर केलेली गानकला  रसिकांना सुखावून गेली. जुन्या, नव्या बहारदार हिंदी चित्रपटातील गीतांनी भूतकाळाच्या रम्य रमणीय काळात अनेकजण गेले. या कार्यक्रमात हौशी गायक कलाकारांनी, दो लब्जो की है दिल की कहानी, हे धी ग्रेट गॅबलर , जाने जा ढूंढता फिर रहा हुं तुम्हे रात दीन मैं  यहाँ से वहा, आजा शाम होने आयी, शान मधील प्यार करनेवाले प्यार करते है शान से, आशा मधील मेघा रे मेघा रे, तेजाब मधील कह दो के तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना , राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील, आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बन के, वीर झा...

पुन्हा एकदा संन्यस्त खड्ग, चिन्मय कटके व सहकाऱ्यांनी पेलले शिवधनुष्य.

Image
 पुन्हा संन्यस्त खड्ग.                                                 लग्न पहावे करून!,घर पहावे बांधून! याच धर्तीवर नाटक पहावे बसवून असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.नाटक तेही ९५ वर्षांपूर्वी चे संगीत नाटक बसवणे म्हणजे खरं तरं वेडेपणा च म्हणावा लागेल पण काही व्यक्तीच अशा असतात ज्यांना एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेले असते अशापैकी एक वल्ली म्हणजे चिन्मय कटके तो स्वतः आणि त्याच्या सवंगड्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.  स्वातंत्र्य वीर सावरकर एक तेज:पुंज अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अफाट वक्तृत्व, दैदिप्यमान आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर निर्मिलेले साहित्य प्रचंड हाल अपेष्टा सोसत असताना मेंदू कसा तल्लख राहतो हा एक चमत्कारच ! स्वातंत्र्य वीर सावरकर या़ंचे प्रखर व्यक्तीमत्व समजावून घेण्यासाठी त्यांचे लेख, कविता आणि नाटके हे साहित्य नक्कीच उपयोगी पडते . सावरकर हे प्रतिभासंपन्न नाटककार होते.रत्नागीरीतील  स्थान बध्दतेच्या काळात त्यांनी उ:शाप,(१९२७ ) संन्य...

स्वरगंध कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा. गानरसीक मंत्रमुग्ध .

Image
 पंढरीतील गान रसिक स्वर तुषरानी चिंब, स्वरगंध या कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी स्वर चैतन्य संगीत समूह यांच्या वतीने आयोजक सौ शर्मिला देशपांडे यांनी अनोख्या स्वरसागरात पंढरपूरकर गान रसिकांना स्वरगंध या कार्यक्रमात स्वर तुषारानी चिंब भिजविले. पंढरपूर येथील आरती प्रांगण येथे गुरूवारी सायंकाळी ही सूरमयी      वाट उत्तरोत्तर रंगत गेली. गाण्याची आवड असलेले पण हौशी गायकांनी हृदयापासून सादर केलेली गानकला  रसिकांना सुखावून गेली. जुन्या, नव्या बहारदार हिंदी चित्रपटातील गीतांनी भूतकाळाच्या रम्य रमणीय काळात अनेकजण गेले. या कार्यक्रमात हौशी गायक कलाकारांनी, दो लब्जो की है दिल की कहानी, हे धी ग्रेट गॅबलर , जाने जा ढूंढता फिर रहा हुं तुम्हे रात दीन मैं  यहाँ से वहा, आजा शाम होने आयी, शान मधील प्यार करनेवाले प्यार करते है शान से, आशा मधील मेघा रे मेघा रे, तेजाब मधील कह दो के तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना , राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील, आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बन के, वीर झा...

पंढरीत मंगळवारी उमेश परिचारक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन.

Image
 *पंढरीत मंगळवार दि. २५ रोजी उमेश परिचारक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन!*  प्रतिनिधी. पंढरपूर येथील डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केयर या हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण व्हावी या उदात्त  हेतूने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.     या आरोग्य शिबीराचे उद्घाटन युरोपियन शुगर चेअरमन मा. उमेशजी परिचारक यांच्या शुभहस्ते व पंढरीतील  जुन्या पिढीतील तज्ञ डॉक्टर मा. वि. अ. वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली, हृदयस्पंदन हार्ट केयर, राहीरकर बिल्डिंग, चंकेश्वरा मेडिकलच्या मागे, सावरकर चौक येथे संपन्न होणार आहे.       या शिबीरात हृदयाच्या आवश्यक असणा-या टू डि इको, इसिजी, सीबीसी/एच बी/एसी, फास्टींग लिपिड प्रोफाईल, सिरम क्रिएटीनीन या सर्व टेस्ट अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत.  तसेच आवश्यकतेनुसार तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मोफत दिला जाणार आहे.         तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बसवराज सुतार ...

राज्य उत्पादन शुल्क अधिकारी दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी.

Image
 सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय..! त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? आमदार अवताडेंचा अधिवेशनामध्ये प्रश्न मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील एका गावामध्ये चौकात असलेल्या पटांगणामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे ते पाणी नेण्यासाठी गावातील सर्व महिला चौकामध्ये येत असतात मात्र त्या आरो फिल्टर च्या बाजूला सहा अवैध दारू विक्रीची दुकाने आहेत त्यामुळे त्या अवैध दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून सर्व महिलांनी सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याची तक्रार केली होती त्या वरिष्ठ पदावर महिला अधिकारी असूनही त्यांनी महिलांच्या तक्रारीची दखल घेतली नाही तेथील अवैध दारू दुकानांचे उद्घाटन त्या गावचे उपसरपंच करत असल्याचेही वर्तमानपत्रात आले होते सध्या सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विकण्याचे परवाने अवैध मार्गाने देते की काय असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे तरी दारू विक्री त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. चौकट आमद...

मंगळवेढा येथील संतांच्या स्मारकासाठी आ समाधान आवताडे यांची लक्षवेधी.

Image
 मंगळवेढा येथील  संताच्या स्मारकासाठी आ. समाधान आवताडे यांची लक्षवेधी  संत बसवेश्वर आणि संत चोखोबा यांच्या स्मारकाचा निधी तातडीने देण्याचीही केली मागणी  पंढरपूर/प्रतिनीधी  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधिमंडळात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून  मंगळवेढा शहरातील जगद़्ज्योती संत महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत चोखोबा महाराजांचे स्मारक उभारणी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.  मंगळवेढा शहरात महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे.  श्री विठ्ठलाच्या पायरीशी एकरूप होणारे संत चोखोबा महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. संत चोखामेळा महाराज संत परंपरेतील सर्वात महत्त्वाचे संत होते तर त्यांच्या कुटुंबात संत सोयराबाई संत निर्मळा संत बंका संत कर्ममेळा असे पाच संत होऊन गेले तसेच  मंगळवेढा शहरात वारकरी संप्रदायातील संत दामाजीपंत, संत गोपाबाई, श्री स्वामी समर्थ, संत टीकाचार्य महाराज, संत सीताराम महाराज, मौनी...

पंढरीच्या शिक्षक डॉक्टरचा विदेशात डंका.

Image
 *पंढरीच्या शिक्षक डॉक्टरांचा विदेशात डंका!*  प्रतिनिधी. पंढरपूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असणारे डॉ. प्रशांत ठाकरे यांच्या परदेशात म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमांची व विविध योजनांची माहिती जाणून घेऊन या उपक्रमांची आपल्या राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात कशी अंमलबजावणी करता येईल या अनुषंगाने डॉ. ठाकरे यांची निवड झाली आहे. या अभ्यास दौ-याचा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौ-यात डॉ. प्रशांत ठाकरे पंढरीचा नावलौकिक नक्की वाढवतील.       डॉ. ठाकरेंना यापूर्वीच येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विशेष गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्या निवडीने कलासाधनाच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या तु-याची भर पडली आहे. डॉ. ठाकरेंनी दिलेले शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक देशाबरोबर परदेशातही पसरला आहे. त्यांचा दौरा यशस्वी झाल्यानंतर कलासाध...

चंद्रभागे सह मतदार संघाकडे लक्ष द्यावे _आ. समाधान आवताडे.

Image
 चंद्रभागेसह मतदार संघाच्या समस्यांकडे आ. समाधान आवताडे यांनी वेधले लक्ष अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंढे देणार चंद्रभागेला भेट; आ. आवताडे यांना सभागृहात दिले आश्वासन पंढरपूर /प्रतिनिधी  राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.  यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा नदी मधील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा शहरातील विविध समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेत भूमिगत गटारीसाठी तसेच आषाढी,कार्तिकी यात्रेसाठी येणारा शासनाचा निधी लवकरात लवकर देऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करून घेण्याची मागणी केली. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्याती असलेल्या पंढरपूरला आपण दक्षिण काशी म्हणून संबोधतो मात्र दूषित पाण्यामुळे येणाऱ्या लाखो भाविकांचा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  चंद्रभागेवरून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि सोलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो मात्र दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रभागा ...

स्वेरी हा एक ब्रँड आहे. पालक प्रतिनिधी अन्सार शेख.

Image
 स्वेरी हा एक ब्रँड आहे                                                -पालक प्रतिनिधी अन्सार शेख स्वेरीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’मध्ये पालक मेळावा संपन्न पंढरपूर-(प्रतिनिधी )‘धकाधकीच्या जीवनात सध्या माणूस हा माणुसकी विसरत चालला आहे. अशा परीस्थितीत पाल्याची प्रगती पाहता स्वेरीची शिक्षण पद्धत कौतुकास्पद आहे. पाल्याच्या विकासासाठी स्वेरीचे परिश्रम हे राज्यात अनुकरणीय आहेत कारण पालक मेळाव्यातून पाल्य, पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद होतो. त्यामुळे या संवादातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देता येतो. जर आमचा पाल्य भविष्यात शासकीय नोकरी करत नसेल तर त्याला उद्योगधंद्याकडे अथवा खाजगी कंपनीत नोकरीकडे वळवले पाहिजे यासाठी त्याची मानसिकता बनविण्याचे कार्य स्वेरी प्रामाणिक करते आहे. म्हणून आम्ही पालक वर्ग आमच्या पाल्यांच्या भविष्यासाठी ‘स्वेरी’ची निवड करतो. आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे स्वेरी हा एक ब्रँड झाला आहे.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी अन्स...

रा. स्व संघाचे स्वयंसेवक वि. मा. मिरासदार यांचे निधन.

Image
 *रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वि.मा.मिरासदार यांचे निधन* पंढरपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपटे उपलब्ध प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव मारुती तथा वि.मा.मिरासदार (वय 91) यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जबाबदाऱ्या मिरासदार यांनी आजपर्यंत पार पाडल्या आहेत. तालुका संघचालक, जिल्हा संघचालक व पुणे विभाग संघचालक अशा जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांनी पार पाडल्या आहेत. आपटे उपलप प्रशालेचे दीर्घकाळ मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भारत विकास परिषद व अन्य सामाजिक संस्था संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पंढरपूरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ते सतत कार्यरत होते.            महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदारांचे ते बंधू होत तर ज्येष्ठ पत्रकार चंद्रहास मिरासदार यांचे वडील होत.  मिरासदार यांच्या पश्चात तीन बंधू, तीन भगिनी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. गोफण परिवार मिरासदार यांच्या दुःखात सहभागी आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

उत्पातांचा लावणी महोत्सव.

Image
 *उत्पातांचा लावणी महोत्सव* चोहीकडे निसर्ग फुलला आहे. ऋतुचक्र आता वसंताच्या उंबरठ्यावर उभे आहे. वसंताचे उष्ण तरीही सुगंधी वात अंगावर येत आहेत. शिशिर आणि वसंताचा हा संधिकाल मनावर विलक्षण मोहिनी घालतो. अशा मोहक वातावरणात होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असा पाच दिवसांचा पंढरपूरच्या उत्पातांचा लावणी महोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो.  महाराष्ट्रात अलीकडील काळात आपली लोककला *लावणी* जपण्याचे काम अनेक कलावंतांनी मोठ्या निष्ठेने केले आहे. पण लावणी म्हटले की माझे काका लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांचे नाव अग्रक्रमाने डोळ्यासमोर येते.  त्यांनी पन्नास वर्षे अविरतपणे लावणीची साधना केली. रूक्मिणी मातेचे परंपरागत पुजारी असलेली उत्पात मंडळी लावणी कडे कसे वळले याचा मोठा  रंजक इतिहास आहे. साधारणपणे सव्वाशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज बाळकोबा उत्पात हे काही कामानिमित्त पुण्यात गेले असता त्यांच्या हाती काही ज्ञात तर काही अज्ञात शाहिरांनी लिहिलेल्या दीड-दोनशे लावण्यांचे हस्तलिखित बाड लागले. ते बाड ते पंढरपूरला घेऊन आले. वाचल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्याला हा फार मोठा खजिना गवसला आहे. ते गाय...

लोखंडी पहारीने हल्ला करून चेन हिसकावल्या प्रकरणी तीन जणांना जामीन मंजूर.

Image
 लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर - लोखंडी पहारीने जखमी करुन सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी नामदेव बजरंग रुपनर, . राहूल नामदेव रुपनर, व. गिरीधर तानाजी मस्के उर्फ बबलु मस्के सर्व रा. तिसंगी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री सुरवसे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी हा आप्पासो दादा येळे हा आहे. यातील फिर्यादी हा वरील ठिकाणी आई मैनाबाई वडिल दादा, पत्नी दिपाली, तीन मुले रिया, श्रेया व प्रणव असे एकत्रात राहणेस असून फिर्यादी हा शेती करून कुटूंबाची उपजिवीका भागवतो. फिर्यादी याच सन २०१८ साली मौजे तिसंगी येथील नामदेव रूपनर यांची मुलगी दिपाली हिचेबरोबर लग्न झालेले होते. मागील तीन वर्षापासून आमचेत व सासरे यांचेत किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. तेव्हापासून आमचे एकमेकांकडे येणेजाणे नाही. दिनांक २४जानेवारी  २०२५ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारास फिर्यादीची साच ...

कॉरिडॉर संदर्भात कोणीही गैरसमज पसरवू नये, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास होणार._आ.समाधान आवताडे.

Image
 चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास आमदार म्हणून नागरिकांच्याच बाजूने  राहणार असल्याचाही दिला विश्वास.. पंढरीतील कॅरीडोर प्रकरणी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नये असे आव्हान आ. समाधान आवताडे यांनी केले.. पंढरपूर/(प्रतिनीधी)  पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॅरीडॉर राबविण्याचा विचार पक्का केला आहे. माञ यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते आजमावणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शासन दरबारी नेमकी माझी भूमिका काय असावी.ही दाखविण्याची  आल्यास आपण चुकीच्या पद्धतीने काम व कोणावर अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या   पाठीशीच उभा राहील. असे आश्वासन आमदार स माधान आवताडे यांनी दिले आहे.  पंढरपूर येथिल कॅरीडॉर बाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासकीय विश्राम येथे गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केले होते. गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर कॅरीडॉर विषय चर्चेत...