रा. स्व संघाचे स्वयंसेवक वि. मा. मिरासदार यांचे निधन.


 *रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वि.मा.मिरासदार यांचे निधन*

पंढरपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपटे उपलब्ध प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विठ्ठलराव मारुती तथा वि.मा.मिरासदार (वय 91) यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक जबाबदाऱ्या मिरासदार यांनी आजपर्यंत पार पाडल्या आहेत. तालुका संघचालक, जिल्हा संघचालक व पुणे विभाग संघचालक अशा जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांनी पार पाडल्या आहेत. आपटे उपलप प्रशालेचे दीर्घकाळ मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भारत विकास परिषद व अन्य सामाजिक संस्था संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पंढरपूरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ते सतत कार्यरत होते.

           महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदारांचे ते बंधू होत तर ज्येष्ठ पत्रकार चंद्रहास मिरासदार यांचे वडील होत.

 मिरासदार यांच्या पश्चात तीन बंधू, तीन भगिनी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे.

गोफण परिवार मिरासदार यांच्या दुःखात सहभागी आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.