ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.


 शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल प्रा. व्ही. डी. परिचारक सरांचा गौरव

पुणे येथे डी वाय पाटील विद्यापीठाकडून "आदर्श शिक्षक"पुरस्काराने सन्मानित.

पंढरपूर(प्रतिनिधी ): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पंढरपूर येथील नामांकित परिचारक क्लासेसचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. व्ही. डी. परिचारक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार समारंभ पुणे येथे अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोहगाव आणि क्रिपोन एज्युटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुधाकर शिंदे तसेच ऑल इंडिया प्रायव्हेट स्कूलचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यांच्या हस्ते परिचारक सरांना सन्मानित करण्यात आले. 


प्रा.परिचारक सर गेले ४२ वर्षे पंढरपूर मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी सायन्स तसेच NEET व JEE या परिक्षांसाठी अत्यंत अवघड असे Physics व Mathematics हे विषय शिकवीत आहेत.

सरांची Physics व Mathematics हे दोन्ही विषय अत्यंत सोपे करून शिकविण्याची पद्धत, गेल्या ४२ वर्षांमध्ये सरांनी घडवलेले शेकडो डॉक्टर, इंजिनियर, तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले त्यांचे विद्यार्थी, आजही तितक्याच तळमळीने काम करण्याची सरांची पद्धत तसेच सरांचा समाजाभिमुख दृष्टिकोन या सर्वांची दखल घेत या वेळी प्रा. परिचारक सरांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


समारंभात उपस्थित मान्यवरांनी प्रा. परिचारक सरांच्या कार्याचा गौरव करताना “त्यांचे योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे” असे प्रतिपादन केले. पंढरपूर शहर व परिसरातून परिचारक सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन होत आहे.

परिचारक सरानी हजारो गोरगरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना फी न घेता दर्जेदार शिक्षण मोफत दिले, अनेक विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली.

सरांच्या परिस स्पर्शाने आज असे विद्यार्थी समृद्ध जीवन जगत असून उत्तम पगाराच्या नोकरी करत आहेत.

हजारो डॉक्टर्स, इंजिनिअर केवळ व्हि डी परिचारक सरांच्या योगदानाचे घडले आहेत, तीर्थक्षेत्र पंढरपूर चे नाव यशोशिखरावर नेत आहेत,

सरांना हा पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर पंढरीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.