कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.


 कॉरिडॉर च्या पैशावरून वाद,चुलता-चुलतीवर पुतण्याने केले चाकूने वार! 

पंढरपूर 

(प्रतिनिधी ) _पंढरपूर येथे कॉरिडॉर मध्ये मिळणाऱ्या पैशावरून एका कुटुंबात कडाक्याची भांडणे होऊन पुतण्याने आपल्याच काका काकू वर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे.

ही घटना बुधवार दि२४रोजी रात्री साडे बारा वाजता  महाद्वार परिसरात असणाऱ्या प्रासादिक साहित्याचे दुकानात घडली. या हल्ल्यात 

      ज्ञानेश्वर वसंतराव सुर्यवंशी व अनिता ज्ञानेश्वर सुर्यवंशी या चुलता-चुलतीवर प्रशांत उर्फ नारायण पांडुरंग सुर्यवंशी नामक पुतण्याने पंढरपूर येथे महाद्वारातील दुकानात ते झोपले असताना जाऊन रात्री १२ :३० चाकूने सपासप वार करुन रक्तबंबाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथील महाद्वारात ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे प्रासादिक दुकान आहे. ते त्यांच्या दुकानी दि.२४ रोजी सपत्नीक झोपले असताना, रात्री १२:३० वाजता उभयतांवर त्यांचा पुतण्या प्रशांत उर्फ नारायण पांडुरंग सुर्यवंशी याने चाकूने सपासप वार करुन रक्तबंबाळ केले आहे. ज्ञानेश्वर वसंतराव सुर्यवंशी व अनिता ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पतकी यांनी तात्काळ दखल घेतल्याने दोन जीव वाचले आहेत.

         १९८२ च्या मास्टर प्लॅन मध्ये सुर्यवंशी कुटुंबाची जागा गेल्याने ते रस्त्यावर आले होते. त्यातच कॉरीडॉर ची घोषणा झाल्याने सुर्यवंशी कुटुंबात घालमेल चालू झाली आहे.

ज्ञानेश्वर यांचा थोरला भाऊ मरण पावला असून त्याला दोन मुले आहेत, कॉरिडॉर प्रकल्प सुरू करण्यात येणार असून याचा मोठा मोबदला येणार होता, मात्र दुकान ज्ञानेश्वर यांच्या ताब्यात असल्याने मोबदला कुणी, किती घ्यायचा यावरून तीव्र मतभेद सुरू होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.