जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी आषाढी वारी नियोजन बैठक घेतली, २५जून पर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार.
भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समिती मार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबतची जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली. जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन * जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी केली विविध ठिकाणची पाहणी * जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅस पुरवठा सुरळीत पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वार चे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, वाखरी पालखीतळ तसेच वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रा...