पंढरपूर येथील पद्मावती जलतरण तलावात बुडून राजस्थानी युवकाचा दुर्दैवी मृत्यू.


 पंढरपूर येथे  नगरपालिकेच्या पद्मावती स्विमिंग टॅंक मध्ये युवकाचा बुडून मृत्यू.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_

पंढरपूर येथील नगरपालिकेच्या स्विमिंग टॅंक (पद्मावती)  येथे सोमवार दि.२४ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मयत युवकाचे नाव नरपत सिंग २१वर्षे, रा.असलाई जिल्हा जोधपुर ,राजस्थान,असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर युवक मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने / खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या सहकाऱ्याने दोर टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच  तलाव व्यवस्थापन]यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने युवकास पाण्याबाहेर काढले. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी पंढरपूर शहर  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

स्विमिंग टॅंक मध्ये सुरक्षा रक्षक (लाईफगार्ड) होता का, सुरक्षा नियमांचे पालन केले होते का, याबाबत नगरपालिका प्रशासन आणि पोलीस तपास करत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.