पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र _प्रमोद बापट.
पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र - प्रमोद बापट पंढरपूर येथे 'संघ शताब्दी मंथन. पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर, _ भारतीय संस्कृती प्राचीन आणि जागतिक स्तरावर वंदनीय आहे. मात्र, जेंव्हा जेंव्हा आपल्याला एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा विसर पडला, तेंव्हा तेंव्हा समाजाची अवनिती झाली आणि देश पारतंत्र्यात ढकलला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले. पंढरपूर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित 'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. वैचारिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील विविध मान्यवरांसाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'हिंदुत्व', 'राष्ट्रभक्ती' आणि 'सामाजिक परिवर्तन' या विषयांवर मंथन करण्यात आले. प्रमोद बापट यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संस्कृतीची महती आणि वर्तमानातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही प्राचीन आणि विश्ववंद्य आहे. अनेक परकीय आक्रमणे झाली, त्या काळात आपल...