पंढरपूर तालुक्यातील कोर्टि येथे जुगार अड्ड्यांवर कारवाई, ६लाख सहा हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त.


 "  जुगार अड्डयावर कारवाई, ४ लाख ०६ हजार ६४० रू. चा मुद्देमाल जप्त "

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध अवैध व्यवसाय सुरू असून यावर कडक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

मंगळवार 

दिनांक ३१मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे   पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे कोर्टी गावातून माळेवस्तीकडे जाणारे उजनी कॅनॉलच्या बाजुस दिनेश दिगंबर चव्हाण याचे शेतातील पत्राशेड समोर काही इसम जुगार खेळत असल्याचे बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांचेकडील पोलीस पथकाने बातमीची खात्री करून छापा मारला. छापा कारवाईत दिनेश दिगंबर चव्हाण, वय ३१ वर्षे , रियाज जावेद सय्यद, वय ३५ वर्षे,  लतिफ दिलावर शेख वय ४९ वर्षे,  तायाप्पा कृष्णा काळे वय ४५ वर्षे,  उमेश मच्छींद्र काळे वय ४५ वर्षे,  नवनाथ अंकुश गडदे, वय ३५ वर्षे, ७) गोविंद विठ्ठल कोळेकर, वय ५५ वर्षे  बिरा पांडुरंग अनुसे वय ४०,  हाजु यासिन शेख वय ६० वर्षे सर्व रा. कोर्टी, ता. पंढरपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांचे कब्जात ४,६४०/- रोख रक्कम, ०८ मोबाईल, ०७ मोटार सायकल व जुगाराचे साहित्य  एकुण ४, लाख सहा हजार सहाशे चाळीस रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आला. म्हणून विनोद सुग्रीव शिंदे यांनी वर नमूद ०९ इसमांविरूध्द सरकारतर्फे मु.जू.अॅ.क. १२ (अ) प्रमाणे फिर्याद दिलेली आहे.

सदरची कारवाई  प्रशांत डगळे साो, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली   कामतकर,  शिंदे,  हुलजंती,  लोंढे यांनी पार पाडलेली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.