Posts

Showing posts from May, 2026

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी आषाढी वारी नियोजन बैठक घेतली, २५जून पर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार.

Image
 भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समिती मार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबतची  जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली.  जतन व संवर्धन आराखड्यातील सुरू असलेली कामे 25 जून पर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन * जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी केली विविध ठिकाणची पाहणी  * जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅस पुरवठा सुरळीत                पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल रुक्मिणी  देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही  कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वार चे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या.             आज जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, वाखरी पालखीतळ तसेच  वाखरी ते पंढरपूर महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक  पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रा...

अधिक महिन्याच्या गर्दीत हरवलेला चिमुकला डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सहकार्याने सापडला, रडून रडून बेजार झालेले मूल विसावले आईच्या कुशीत.

Image
 अधिक महिन्याच्या   गर्दीत हरवलेल्या छोट्या बाळाची भेट झाली भाजपा महिला जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सहकार्याने. रडून रडून बेजार मूल विसावले आईच्या कुशीत. , पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर शहरात दिवसेंदिवस अधिक महिन्याची गर्दी वाढत आहे याच गर्दीत एक चार वर्षांचा चिमुकला हरवला पण भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या विशेष प्रयत्नाने तो पुन्हा आईच्या कुशीत विसावला, सोमवार दि.२५रोजी    संध्याकाळी सहा वाजल्यापासून व्हिआयपी गेट चौफाळा विठ्ठल मंदिर परिसर पंढरपूर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या व्हीआयपी गेटमधून एक सूचना वारंवार लाऊड स्पीकर वरती येत होती,  ती अशी चार वर्षाचा एक छोटा मुलगा हरवलेला आहे व स्वतःचं नाव तेजू सांगत आहे त्यांनी कॅप घातलेली आहे त्याचे कोणी नातेवाईक जर जवळपास असतील तर त्यांनी त्या छोट्या मुलाला घेऊन जावे,  अशा प्रकारची माईक वरून सूचना माढा होमगार्डचे  अजित नागनाथ मदने, त्याचबरोबर माढा होमगार्डचे प्रमोद महादेव कारंडे सौ. सुषमा गायकवाड सौ. मीनाक्षी गुंड हे वारंवार पुकारत होते . त्या छोट्या मुलाला घेऊन हे...

आंबे येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई शंभर ब्रास वाळू, दोन टिपर, एक जेसीबी जप्त.

Image
 आंबे येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई, शंभर ब्रास वाळूसह दोन टिपर, एक जेसीबी जप्त.  पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर शहर आणि तालुक्यात पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत असून आंबे या परिसरात सुमारे १००ब्रास वाळू आणि दोन टिपर , एक जेसीबी जप्त करण्यात आले आहेत. सहा. पोलीस अधिक्षक . प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई  सोमवार दिनांक २५मे रोजी सकाळी केली.  रोंगे, हेंबाडे,  हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात आली असून  मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिप्परमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी अंदाजे १०० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कारवाई दरम्यान पोलीस पथकाने जेसीबी मशीन थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जेसीबी चालक तसेच एका यारी ...

कॅनडा आणि खलिस्तानी धोका.

Image
 नकारापासून मान्यतेकडे: कॅनडा आणि खलिस्तानी धोका. *लेखक: निजीश एन, संशोधन सहयोगी, इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट* -- *CSIS सार्वजनिक अहवाल 2025, 1 मे 2026*   कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसने कॅनडास्थित खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवायांना "राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंसक अतिरेक" या गटात वर्गीकृत केले. अहवालात म्हटले आहे की कॅनडा-बेस्ड खलिस्तानी अतिरेकी कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि हितसंबंधांना सतत धोका देत आहेत. ते कॅनडाचा वापर प्रामुख्याने भारतात हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी, निधी गोळा करण्यासाठी किंवा हिंसक कारवायांचे नियोजन करण्यासाठी करत आहेत. अहवालात 1985 च्या एअर इंडिया फ्लाइट 182 बॉम्बस्फोटाच्या 40 व्या वर्धापनदिनाचा उल्लेख करून खलिस्तानी हिंसाचाराच्या इतिहासावर भर दिला आहे. *महत्त्वाचा फरक*   अहवाल स्पष्टपणे नमूद करतो की खलिस्तानसाठी शांततापूर्ण वकिली करणे हा गुन्हा नाही आणि तो कॅनेडियन कायद्यानुसार संरक्षित आहे. फक्त जे लोक हिंसेला प्रोत्साहन देतात, निधी गोळा करतात किंवा हिंसक कारवायांचे नियोजन करण्यासाठी कॅनडाचा वापर करतात, त्यांनाच ...

व्हि बी ग्रामजी, ग्रामीण रोजगाराचे नवे पर्व.

Image
 *भारताने मनरेगाच्या जागी व्हीबी-जी राम जी कायदा आणला: ग्रामीण रोजगाराचे नवे पर्व*  भारताच्या ग्रामीण रोजगार व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण फेरबदल घडवून आणत, केंद्र सरकारने 'विक्सित भारत - रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५' (VB-G RAM G) लागू केला आहे. १ जुलै २०२६ पासून अंमलात येणाऱ्या या कायद्यामुळे, २००५ पासून ग्रामीण मजुरी रोजगाराचे नियमन करणारा 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (MGNREGA) एकाच वेळी रद्द होईल. हा नवीन कायदा केवळ कल्याणकारी योजनेकडून एका व्यापक चौकटीकडे निर्णायक स्थित्यंतर दर्शवतो, जी हमीयुक्त रोजगाराला उत्पादक मालमत्ता निर्मिती आणि 'विक्सित भारत @२०४७' च्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जोडते.  _ग्रामीण भारतातील आश्वासित रोजगारासाठीची हमी प्रति आर्थिक वर्ष १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही २५% वाढ आहे._   *प्रमुख बदल: अधिक दिवस, मोठी हमी*  ग्रामीण कुटुंबांसाठी सर्वात तात्काळ बदल म्हणजे मनरेगा अंतर्गत हमीयुक्त मजुरी रोजगाराचा कालावधी प्रति आर्थिक वर्ष १०० दिवसांवरून १२५ दिवसांपर्यंत वाढवणे. ज्या ग्राम...

शहरी नक्षलवाद आणि पाळेमुळे.

Image
 जंगलातून शहराकडे: डाव्या अतिरेकवादाचा शहरी रूपांतरण ओडिशातील रायगडामधील आदिवासी आंदोलन आणि नोएडामधील कामगार आंदोलन — या दोन अलीकडील घटनांमध्ये एक समान धागा दिसतो. त्या सूचित करतात की डाव्या अतिरेकवादाचा प्रश्न बस्तरमध्ये संपलेला नाही. तो जणू स्थलांतरित झाला आहे. ७ एप्रिल रोजी ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील काशीपूरजवळ आदिवासी गावकरी आणि पोलिसांमध्ये चकमकी झाल्या, ज्यात किमान ४० सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि २५ गावकरी जखमी झाले. विश्वासार्ह गुप्तचर माहिती सूचित करते की या आंदोलनात CPI (माओवादी) संबंधित फ्रंट संघटनांची उपस्थिती होती. काही दिवसांपूर्वी, नोएडामध्ये कामगार आंदोलन हिंसक झाले. मुख्य आरोपी आदित्य आनंद — NIT-शिक्षित अभियंता — हा प्र-डाव्या अतिरेकवादी (LWE) संघटनांचा समर्थक असल्याचे समोर आले, ज्याचे २०२२ पासून लखनौस्थित ‘मजदूर बिगुल’ या कामगार हक्क संघटनेशी संबंध आढळले. तपासकर्त्यांनी त्याला दिशा स्टुडंट ऑर्गनायझेशन, रिव्होल्युशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि नौजवान भारत सभा या प्र-LWE शहरी संघटनांशीही जोडले. स्वतःमध्ये प्रत्येक घटना स्वतंत्र अस्थिरतेसारखी वाटते. पण एकत्र पाहिल्य...

पंढरपूरची वाहतूक कोंडीतून सुटका, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मागणीला यश.

Image
 पंढरपूरच्या वाहतूक कोंडीतून सुटका मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मागणीला यश! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाव या नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी पंढरपूर:(प्रतिनिधी) पंढरपूर शहरांतर्गत होणारी जड वाहतुकीची कोंडी आणि वारकरी-स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी यांनी परिचारक यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, या प्रस्तावित चार पदरी बाह्य वळण रिंग रोडचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या मार्फत करण्यात यावे अशी विशेष मागणी केली. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्याला तात्काळ निधी मंजूर करण्याची घोषणा ना.गडकरी यांनी यावेळी केली. वेणेगाव-पंढरपूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या मार्गांवर सध्या आंतरराज्यीय जड वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. उत्तर भारताकडून अहिल्यानगर, करमाळा आणि टेंभुर्णी मार्गे येणारी मल्टी-एक्सल वाहने...

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.

Image
 उदय निरगुडकर यांच्या प्रेरणादाई मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले. पंढरपूर येथील प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम.  पंढरपूर (प्रतिनिधी)_  ज्येष्ठ पत्रकार व 'झी चोवीस तास' तसेच 'न्यूज १८ लोकमत' चे माजी मुख्य संपादक  उदय निरगुडकर यांनी  पंढरपूर येथील प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांना अभ्यास, यश आणि करिअरविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाराष्ट्र नॉलेज सेंटर सोलापूर चे . रविराज पवार तसेच महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणे चे  सचिन शिंदे यांची देखील उपस्थिती लाभली. या प्रसंगी उदय निरगुडकर यांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारे पंढरपूर चे तीन विद्यार्थी चि. रुद्र अभय उत्पात, चि. मिहिर मकरंद बडवे व चि. अथर्व अमित वाडेकर तसेच प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट चे इयत्ता बाराव...

स्वेरीतील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष विद्यार्थी व पालकांना फायदेशीर ठरणार._प्रा.मंदार परिचारक सर.

Image
 स्वेरीतील प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष विद्यार्थी व पालकांना ठरणार फायदेशीर                                                                                      -प्रा. मंदार परिचारक   स्वेरीत 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ थाटात उदघाटन पंढरपूर(प्रतिनिधी)- ‘आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना योग्य दिशा मिळेलच हे सांगता येत नाही. यासाठी विशेष करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी आपण उघडलेल्या मार्गदर्शन कक्षाची  गरजवंत विद्यार्थ्यांना खरी गरज आहे. स्वेरीचा हा मार्गदर्शन कक्ष विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना निश्चितच फायदेशीर ठरण...

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या तीस महिन्यात पूर्ण करा._मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
 पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी ४२५०.४६ कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता          मुंबई, (प्रतिनिधी )मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान  आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील ५० वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या ३० महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.         मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वने मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ज...