आंबे येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई शंभर ब्रास वाळू, दोन टिपर, एक जेसीबी जप्त.


 आंबे येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई,

शंभर ब्रास वाळूसह दोन टिपर, एक जेसीबी जप्त.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर शहर आणि तालुक्यात पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत असून आंबे या परिसरात सुमारे १००ब्रास वाळू आणि दोन टिपर , एक जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.

सहा. पोलीस अधिक्षक . प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

सोमवार दिनांक २५मे रोजी सकाळी केली.

 रोंगे, हेंबाडे,  हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात आली असून 

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिप्परमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी अंदाजे १०० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाले.


कारवाई दरम्यान पोलीस पथकाने जेसीबी मशीन थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जेसीबी चालक तसेच एका यारी ट्रॅक्टर चालकाने पोलीस पथकास पाहून वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेली वाहने ताब्यात घेतली असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे . यावेळी 

 टिप्पर क्रमांक बी आर २जी ए ३१८८

चालक – गणेश गांडुळे

मालक - प्रकाश गायकवाड

 टिप्पर क्रमांक उपलब्ध नाही

चालक – सिद्धू लाला कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्या जेसीबीचा मालक नागेश आसबे, रा. गोपालपूर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.