Posts

Showing posts from July, 2026

श्री विठ्ठलास छप्पन लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६.५९ लाख रुपयांच्या सोने पादुकांचे दान पंढरपूर (प्रतिनिधी ) – आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मंदिर समितीकडे रोख देणगीबरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोने पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत रु. ५६,५९,००० इतकी होत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये दानस्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सोने, चांदीच्या मौल्यवान वस्तू दान करावयाच्या आहेत, त्यांनी मंदिर स...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयल च्या वडिलाना दणका, पुणे मार्केट यार्ड येथील दुकान सील.,

Image
 🟦⭕ *तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील*                                                                              पुणे : पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. सिया गोयल ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली. तिचं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण सियाचं चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं. सिया आणि चेतन या दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांना आता मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.            अन्न आणि औषध प्रश...

मार्केट यार्ड ला क्षेत्रभेटीतून विद्यार्थांनी घेतला शेतीमाल व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव.

Image
 मार्केट यार्डला क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीमाल व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव प्रतिनिधी, पंढरपूर _ विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जीवनोपयोगी ज्ञान मिळावे, या उद्देशाने आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची पंढरपूर येथील मार्केट यार्ड येथे शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात पार पडली. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया, लिलाव पद्धती, मालाची प्रतवारी, वजनकाट्यांचा वापर, साठवणूक, वाहतूक व्यवस्था तसेच शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांचे कामकाज जवळून पाहिले. बाजार समितीच्या कार्यपद्धतीची माहिती घेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात भर घातली. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शेती अर्थव्यवस्था आणि बाजार व्यवस्थेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, जिज्ञासा आणि व्यवहारज्ञान विकसित होण्यास मोठी मदत झाली. पुस्तकातील ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवाशी सांगड घालत विद्यार्थ्यांनी ही क्षेत्रभेट आनंददायी आणि ज्ञानवर...

पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, नऊ लाख ३०हजार रुपयाचे सोने जप्त.

Image
 पंढरपुर शहर पोलीस ठाणे, "गुन्हे प्रकटीकरण शाखेची" धडाकेबाज कामगीरी सोन्याचे दागीने चोरणाऱ्या आरोपी कडुन ९, लाख तीस हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त. आषाढी वारीच्या तोंडावर गुन्हेगार जेरबंद.  पंढरपूर _(प्रतिनिधी) पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणुन तीन आरोपीतांना अटक करून गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली. अतुल कुलकर्णी., पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण,  विजयकुमार कबाडे अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये  प्रशांत डगळे, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर व  टी वाय मुजावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर दाखल गुन्हयातील फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे, रा. शिक्षक कॉलनी, माळशिरस जिल्हा सोलापूर. हे दिनांक रोजी १७एप्रिल रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास माळशिरस ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना २८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा- तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे चा...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जीर्णोध्दार पूर्ण, चार मूर्तींची होणार प्राणपतिष्ठा.

Image
 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखडा; जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा . दिनांक ४ व ५ जुलै रोजी होणार चार मूर्तींची प्राणप्रतिष्ठा          पंढरपूर (प्रतिनिधी): श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दि. ४ व ५ जुलै रोजी विधीपूर्वक संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.         सदरची सर्व कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत. श्री व्यंकटेश मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील या मंदिराच्या बाहेरील भिंतींना तडे गेले होते तसेच भिंती बाहेरच्या दिशेने फुगल्या होत्या. त्यामुळे जीर्णोद्धारामध्ये मंदिराची संपूर्ण मोजमापासह नोंद करण्यात आली. प्रत्येक दगडाला क्रमांक देऊन त्याची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. त्यानंतर  स...