ऐन आषाढी एकादशी दिवशी पोलिसाची आत्महत्या.
ऐन आषाढी एकादशी दिवशी एस आर पी एफ जवानाने गोळी झाडून केली आत्महत्या, पोलीस दलात खळबळ,आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
पंढरपूर(प्रतिनिधी )_भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे ऐन आषाढी देवशयनी एकादशी दिवशी पंढरपूर येथे वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एस आर पी एफ जवानाने सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
शनिवार दि २५जुलैरोजी जुना कासेगाव रोड येथील एका शाळेत मुक्कामास असताना त्याने हे कृत्य केले,असून पावन पर्वावर दुःखाची छाया पसरली आहे,
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठ्ठलमय झाले असतानाच अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर घडली आहे. वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पंढरपूरसह पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
महापूजेच्या वेळीच दुर्दैवी घटना घडली असून
रामेश्वर ध्रुपद साबणे असे जीवन संपवणाऱ्या (वय ३० रा. गंगाखेड, ता.परभणी) असे एसआरपीएफ जवानाचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, ज्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती, त्याच सुमारास रामेश्वर यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून हे टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येचे
कारण
अद्याप अस्पष्ट आहे.
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनी ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment