अधिक महिन्याच्या गर्दीत हरवलेला चिमुकला डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सहकार्याने सापडला, रडून रडून बेजार झालेले मूल विसावले आईच्या कुशीत.
अधिक महिन्याच्या गर्दीत हरवलेल्या छोट्या बाळाची भेट झाली भाजपा महिला जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सहकार्याने.
रडून रडून बेजार मूल विसावले आईच्या कुशीत.
, पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर शहरात दिवसेंदिवस अधिक महिन्याची गर्दी वाढत आहे याच गर्दीत एक चार वर्षांचा चिमुकला हरवला पण भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या विशेष प्रयत्नाने तो पुन्हा आईच्या कुशीत विसावला,
सोमवार दि.२५रोजी
संध्याकाळी सहा वाजल्यापासून व्हिआयपी गेट चौफाळा विठ्ठल मंदिर परिसर पंढरपूर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या व्हीआयपी गेटमधून एक सूचना वारंवार लाऊड स्पीकर वरती येत होती,
ती अशी चार वर्षाचा एक छोटा मुलगा हरवलेला आहे व स्वतःचं नाव तेजू सांगत आहे त्यांनी कॅप घातलेली आहे त्याचे कोणी नातेवाईक जर जवळपास असतील तर त्यांनी त्या छोट्या मुलाला घेऊन जावे,
अशा प्रकारची माईक वरून सूचना माढा होमगार्डचे अजित नागनाथ मदने, त्याचबरोबर माढा होमगार्डचे प्रमोद महादेव कारंडे
सौ. सुषमा गायकवाड
सौ. मीनाक्षी गुंड
हे वारंवार पुकारत होते .
त्या छोट्या मुलाला घेऊन हे दोन्हीही होमगार्ड व्हीआयपी घेतला बसलेले होते त्या मुलाला खाऊ घालत होते त्याला रडू नये म्हणून धीर देत होते मुलगा सातत्याने रडत होता मुलाला लवकर नाव सांगता येत नव्हतं त्याचबरोबर चार वर्षाचा असल्याकारणाने त्याला मोबाईल नंबर देखील सांगता येत नव्हता तेवढेच सांगत होता की मी माझ्या आत्या बरोबर आलो आहे
त्या मुलाचं ते कळवळन बघून डॉ प्राजक्ता बेणारे यांनी त्या घराकडे जात असताना व्हीआयपी गेट वरती त्या मुलाची चौकशी केली
व्हीआयपी पोलीस प्रशासनाने सांगितले की तो छोटा मुलगा त्याच्या नातेवाईकांच्या पासून हरवलेला आहे आणि त्याला फक्त त्याचं नाव सांगता येत आहे बाकी तो काहीही माहिती पुरवू शकत नाही आणि गावाचं नाव त्यांनी जहागीरदार वाडी असं सांगितलेलं आहे
हे सर्व माहिती डॉ प्राजक्ता बेणारे यांनी ऐकल्यानंतर घराकडे गेल्यावर महाविद्यालयीन सहकारी ज्यांनी पोलीस प्रशासनात पीआय म्हणून निवृत्ती घेतली आणि ज्यांनी मंदिर परिसरातील सर्व व्हीआयपी गेट वरती अत्यंत उत्तमपणे काम केलं असे मित्र अल्ताफ काझी यांना विचारलं की जागीरदार वाडी कुठे आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इंदापूर बारामती तालुक्याच्या मध्ये एक जहागीरदार वाडी आहे
परंतु त्यावरूनही काही शोध आणि बोध होईना
त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन सहकारी पत्रकार त्याचबरोबर पंढरी भूषण या वृत्तपत्राचे संपादक शिवाजी शिंदे यांना फोन करून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जहागीरदार वाडी आहेत तेवढ्या सगळ्या कळवा म्हणून सांगितलं
भारतीय जनता पार्टीचे काम करणाऱ्या जिल्हा सरचिटणीस आणि भाजपा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सौ सुप्रिया अमित काकडे या देखील शक्य ती मदत करत होत्या,
त्यांनी जेवढ्या जहागीरदार वाडी आहेत तेवढ्या पोलीस स्टेशनचे नंबर घ्यायला सुरुवात केली परंतु योगायोगाने उस्मानाबाद तालुका जिल्हा, या ठिकाणची एक जहागिरदार वाडी सापडली आणि त्या ठिकाणी सुप्रिया काकडे यांचे शालेय सहकारी----मोहन अढे
ज्यांचं त्या ठिकाणी मेडिकलचे दुकान आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना मुलाचं नाव सांगितलं मुलाचं नाव तेजू रणखांब असं तो मुलगा नाव सांगतोय
तो म्हणाला की जहागीरदार वाडी या परिसरामध्ये या नावाचे लोक राहतात
यादरम्यान माढा तालुक्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष सतर्क आमदार अभिजीत पाटील यांना डॉ प्राजक्ता बेणारे यांचा मुलगा पार्थ बेणारे, यांना या हरवलेला मुलाच्या संदर्भात पूर्ण कल्पना दिली,
अभिजीत आबांनी तात्काळ जहागीरदार वाडी येथील सरपंच यांना ही माहिती कळवली आणि त्यानंतर तेथील सरपंचांचा फोन सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे यांना आला त्यानंतर जागीरदार वाडीचे सरपंचअविनाश चव्हाण यांनी सांगितले की सदर मुलगा हा आमच्याच गावचा आहे आणि मी तुम्हाला त्यांच्या आईशी बोलणं करून देतो त्याच्या वडिलांशी बोलणं करून देतो परंतु त्याचे वडील हे ट्रक ड्रायव्हर आहेत आणि ते आता सध्या गुजरात मध्ये असून त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो
हे सर्व बोलणं झाल्यानंतर आम्ही त्याच्या वडिलांना फोन लावला आणि त्यानंतर डॉ प्राजक्ता बेणारे आणि सौ काकडे यांनी मुलाकडे छोट्या बाळाकडे त्याच्या वडिलांचा फोन लावून दिला आणि त्यानंतर त्या मुलाला वडलाचा आवाज ऐकून रडू आवरे ना यादरम्यान त्याचे चुलते बापू रणखांब हे देखील बोलले
त्यानंतर त्यांच्या मुलाची आई सुप्रिया रणखांब यांनी सांगितलं की हा माझा मुलगा आहे आणि त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देताना मला फोन करा
साधारण दोन तासांनी त्यांचे नातेवाईक हे *चौफाळा पंढरपूर पोलीस प्रशासन व्हीआयपी गेटला आल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांना चांगलच सुनावलं
वास्तविक एवढ्या छोट्या बाळाला पंढरपूरच्या गर्दीत आणायचं नव्हतं आणि आणलं तर त्याचा हाच सोडायचा नव्हता अशा पद्धतीने हा सर्व प्रसंग घडला
यावेळेस त्या छोट्या बाळाला समजून सांगताना त्याचा रडू थांबवण्याकरता होमगार्ड महिला सुषमा गायकवाड माढा यांनी एका आईच्या भूमिकेतून त्या बाळाला अतिशय जपलं
ही गोष्ट मुख्य पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार साहेबांच्या पर्यंत पोहोचली त्यानंतर या बाळाला घेऊन
डॉ प्राजक्ता बेणारे आणि सौ काकडे त्याचबरोबर सोशल मीडिया प्रमुख त्याचबरोबर सर्व होमगार्डचे लोक पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी ठाणे अंमलदार *राजेंद्र घोडके आणि संभाजी भोसले पोलीस नाईक
या सर्वांनी त्यांच्या बाळाच्या सोबत जेवढे नातेवाईक आले होते त्यांच्याकडून लिहून घेतलं त्यांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्या मुलाच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून हे सर्व नातेवाईक तुमचेच आहेत का म्हणून पोलीस प्रशासनाने विचारण्यात केल्यानंतर त्या बाळाला या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये सोपवण्यात आले . पार्थ बेणारे याने धाराशिव चे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या स्वीय सचिवांना फोन केला होता त्यांनी देखील पूर्ण सूत्र फिरवली आणि या जागीरदार वाडी आणि त्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध लागला अशाप्रकारे एका छोट्या बालकासाठी पंढरपूर पोलीस प्रशासन माढा होमगार्डचे लोक त्याचबरोबर आदरणीय खासदार *ओमराजे निंबाळकर, आमदार *अभिजीत आबा पाटील* त्याचबरोबर जागीरदार वाढीचे सरपंच-- अविनाश चव्हाण
या सर्वांचे सहकार्य लाभलं आणि मंगळवारी सकाळी हे छोटं बाळ त्याच्या आईच्या कुशीत विसावलं
वास्तविक सध्या एकंदर समाजाची परिस्थिती पाहता लहान मुलांच्या वरती होणारे अत्याचाराचे प्रमाण अतिशय वाढलेला आहे पण आज पंढरपूर मध्ये अधिकमास चालू आहे पुढच्या महिन्यात आषाढी वारी आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन ते पंढरपूरचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल अत्यंत सतर्क राहून लहान मुलांना तात्काळ शोधून काढून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचं काम अत्यंत उत्तमपणे करतं याबद्दल पंढरपूर पोलीस प्रशासनाचा अतिशय अभिमान स्थानिक लोकांमध्ये आहे
*जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायाच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं
बाळ मातेपाशी सांगे तहानभूक
उपायाचे दुःख काय जाणे!
तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता
माझी काही चिंता असू द्यावी*
सर्व संतांनी पांडुरंगाला आई म्हणलेला आहे विठू माझा लेकुरवाळा संगे संत मंडळी आणि गोपाळांचा मेळा अशी परिस्थिती विठुरायाचे आणि कालच्या प्रसंगात विठुरायांनीच सर्वांना बळ दिलं सर्वांना बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे पावलं घडत गेली आणि सर्व यंत्रणा कामाला लागली आणि मूल आईच्या कुशीत गेल.
संपादक.चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment