ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.
ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर.
पंढरपूर (प्रतिनिधी)ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र पंढरपूरच्या वतीने शुक्रवारी दिनांक १० एप्रिल रोजी ज्योतिरमय योगाच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्योतिर्मय योगाच्या संचालिका डॉ ज्योती शेटे यांनी महिलांच्या करता आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
त्याबरोबर सर्व महिलांचे आणि योग साधिकांचे मोफत रक्त तपासणी कॅम्प घेतला या शिबिराचा पंढरपुरातील इतर महिलांनीही लाभ घेतला सदर कॅम्पमध्ये सीबीसी, कम्प्लीट ब्लड काउंट एज, बी ए वन सी कॅल्शियम विटामिन बी ट्वेल विटामिन डी या सर्व तपासण्या महिलांच्या मोफत करून घेतल्या. आरोग्याबाबत जागरूकता ही हवीच या संकल्पनेनुसार १० एप्रिल रोजी योग भवन एलआयसी ऑफिसच्या शेजारी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १३० महिलांच्या वरील रक्त तपासणी करण्यात आली ज्या तपासणी करण्यासाठी ५हजार पेक्षा जास्त खर्च येतो त्या सर्व तपासण्या काल मोफत करण्यात आल्या काळाची गरज आणि आधुनिक जीवनशैली चुकीच्या आहारामुळे येणाऱ्या विटामिन कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात आणि त्या आजाराचं निदान करण्याकरता काल ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या सर्वेसर्वा आणि संचालिका डॉ ज्योती शेटे यांनी या शिबिराच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती केली.
या शिबिरास भाजपा महिला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांनी विशेष सहकार्य केले
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment