कौशल्य विकास केंद्र पंढरपूर यांच्या वतीने बेरोजगार होतकरू युवकांसाठी सुवर्णसंधी.


 बेरोजगार, होतकरू युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने सुवर्णसंधी.

पंढरपूर (प्रतिनिधी)कौशल्य विकास केंद्र पंढरपूर आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर आणि तालुक्यातील होतकरू युवकांसाठी सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यात आली असून शुक्रवार दी १७एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटी चे द ह कवठेकर विद्यालय (तालुका पोलीस स्टेशन मागे)मधील कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी हा मेळावा सकाळी १०ते दुपारी ३या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

सुयोग्य निवड झालेल्या प्रतिनिधीस १५ते ३०हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. वयोमर्यादा १८ते ३५अशी असणार आहे .

२०पेक्षा जास्त नामांकित कंपन्या मध्ये २०००हून अधिक विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी सर्व शाखेतील पदवीधर , दहावी, बारावी पास/ नापास आय टी आय,(सर्व ट्रेड) डिप्लोमा इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, सी एन सी ऑपरेटर,CIPET आदी शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात,

अधिक माहितीसाठी ९३७१२२२२९०, ९६०७९६५७४२या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.