कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन, कर्माटेक २०२६ संपन्न होणार..


 *कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.*

 

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२६” 


 

विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पंढरपूर येथे गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी “कर्माटेक २०२६” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.  

याबाबत ची अधिक माहिती देताना "कर्माटेक २०२६" चे संयोजक डॉ. अभय उत्पात म्हणाले की  “कर्माटेक २०२६” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये कोड फोर्सेस, रोबो रेस, टेक्नो रिल्स, इलेक्ट्रॉनिक्स क्विझ, सर्किट सुडोकू,  ब्रिज मॉडेल मेकिंग, ग्रीन बिल्डिंग, बेस्ट फ्रॉम वेस्ट, प्रोजेक्ट एक्सिबीशन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या सर्व स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर होतील. तसेच सदरच्या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस पी पाटील व “कर्माटेक २०२६" चे संयोजक डॉ. अभय उत्पात व  समन्वयक डॉ.एस व्ही एकलारकर यांनी केले आहे 

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.