बारा तोळे सोने, तीस भार चांदी जप्त, पंढरपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.


  •  

  • बारा तोळे सोने आणि तीस भार चांदी जप्त

    • चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात पंढरपूर शहर पोलीसांना यश

    • पंढरपूर : पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या"गुन्हे प्रकटीकरण शाखेने 12.50 तोळे सोन्याचे दागिणे व 30 भार चांदीचे घरफोडीत चोरी झालेले दागिणे  धडाकेबाज कामगीरी करत आरोपीकडुन १७ लाख १,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे.

    • पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. 25 रोजी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखळ झाला होता. त्याअुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत होती. पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेने विशेष पथके नेमले. पंढरपुर शहर व आजुबाजूचे सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात आरोपी  सुनिलकुमार रामसिंग राजपूत (वय. २६)  रा. मुळग्राम बिकापुरी, पोस्ट हिरापुरा भिंड. मध्यप्रदेश, संध्या रा. आढेगाव टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापूर यास ताब्यात घेतले.दि.२७ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १२.५० तोळे सोन्याचे दागीने व ३० भार चांदीचे दागीने असे व असा एकुण १७,०१,५०० जप्त करण्यात आला आहे.

    • सदरची कामगीरी  पोसई सुप्रिया रावण, पोलीस उपनिरीक्षक  नितीन जगताप, सपोफौ सुजित उबाळे, सचिन हेंबाडे, अनिल बनसोडे, अस्लम काझी, गणेश पवार, हर्षद ठाकर, शहाजी मंडले, सांवत, प्रविण मेटकरी यांनी केली आहे.
    • संपादक.
    • चैतन्य उत्पात.

    Comments

    Popular posts from this blog

    पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

    पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

    ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.