आनंदाची बातमी, श्री पांडुरंग साखर कारखाना यांच्या वतीने केवळ २५रु किलो दराने साखर सभासदांसाठी मिळणार, ३१ऑगस्ट पासून वाखरी येथील कार्यालयातून वाटप.
पांडुरंग साखर कारखान्याकडून सभासदांसाठी २५ रुपये किलो दराने साखर, ३१ ऑगस्ट पासून वाटप सुरू.
पंढरपूर(प्रतिनिधी )_कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूरकडून सभासदांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने दर्जेदार साखर अत्यल्प दरात म्हणजेच प्रति किलो २५ रुपये दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही साखर वाटप योजना सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाखरी कार्यालयातून तसेच श्रीपूर येथील कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्रातून सभासदांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे.
कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, साखर वाटप फक्त सभासदांसाठीच करण्यात येणार असून, साखर घेण्यासाठी सभासदांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
दरम्यान, बाजारातील साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने आपल्या सभासदांसाठी केवळ २५ रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संपादक
चैतन्य उत्पात

Comments
Post a Comment