श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर.
*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनिम्मित आज रक्तदान शिबिर.
प्रतिनिधी पंढरपूर _
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर शनिवार दि२९मार्चरोजी श्री संत दामाजी मठ, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी साडे आठ ते पाच वाजेपर्यंत शिबिर होणार आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० जयंती
संत शिरोमणी नामदेवरयांचे ७५५ जयंती वर्ष आणि ६७५ वा समाधी सोहळ्याचे वर्ष आहे
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना जलसमाधी सोहळा ल्या ४२५ वर्ष झाली. ४२६ सोहळा काल नाथ षष्ठी ला झाला.*
नाथ महाराजांना भागवत लिहून ४५२ वर्ष पूर्ण झाली
जगतगुरु संत श्री तुकाराम महाराजांचे ३७५ वा वैकुंठ गमन सोहळा नुकताच झाला.
यासर्वांचे औचित्य साधून या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे.
रक्तदात्यास श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने १७ संतांची चरित्र भेट देण्यात येणार आहेत. अशी माहिती श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने देण्यात आली.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment