मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरीत.
पंढरपूर
(प्रतिनिधी) पंढरपूर येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीस तसेच पंढरपूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिचारक यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच पंढरपूर येथे येत असून प्रशांत परिचारक यांना ते भेटणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केवळ फडणवीस यांच्या शब्दा खातर आ. समाधान आवताडे यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या दौऱ्यानिमित्त राजकीय वर्तुळात तसेच परिचारक समर्थकात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment