स्वरगंध कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा. गानरसीक मंत्रमुग्ध .
पंढरीतील गान रसिक स्वर तुषरानी चिंब,
स्वरगंध या कार्यक्रमाने वैशाख वणव्यात गीतांचा सुखद शिडकावा.
पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे गुरुवार दि २०मार्च रोजी स्वर चैतन्य संगीत समूह यांच्या वतीने आयोजक सौ शर्मिला देशपांडे यांनी अनोख्या स्वरसागरात पंढरपूरकर गान रसिकांना स्वरगंध या कार्यक्रमात स्वर तुषारानी चिंब भिजविले.
पंढरपूर येथील आरती प्रांगण येथे गुरूवारी सायंकाळी ही सूरमयी
वाट उत्तरोत्तर रंगत गेली.
गाण्याची आवड असलेले पण हौशी गायकांनी हृदयापासून सादर केलेली गानकला रसिकांना सुखावून गेली.
जुन्या, नव्या बहारदार हिंदी चित्रपटातील गीतांनी भूतकाळाच्या रम्य रमणीय काळात अनेकजण गेले.
या कार्यक्रमात हौशी गायक कलाकारांनी, दो लब्जो की है दिल की कहानी, हे धी ग्रेट गॅबलर , जाने जा ढूंढता फिर रहा हुं तुम्हे रात दीन मैं
यहाँ से वहा, आजा शाम होने आयी, शान मधील प्यार करनेवाले प्यार करते है शान से, आशा मधील मेघा रे मेघा रे, तेजाब मधील कह दो के तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना ,
राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील, आये हो मेरी जिंदगी मे तुम बहार बन के,
वीर झारा मधील जानम देख लो मीट गई दुरिया, मैं यहाँ हुं, यहाँ हुं अशी अवीट गोडी ची गाणी सादर केली.
या कार्यक्रमात विद्या बहिरट, मानसी कर्वे, उदय उत्पात, बाळासाहेब यलमार, सारिका कोठा डीया, अनुराधा कोठाडीया,
रत्नाकर देशपांडे, सायली शहा, श्रिया शिरगावकर, सुवर्णा सावळे, राजाराम मस्के, अमिता इनामदार, रोहन कोठाडीया, श्रद्धा गुज्जलवार, अमृता सादिगले या हौशी गायकांनी सुमारे २८गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे निवेदन सौ मैत्रेयी केसकर यांनी केले.
सायंकाळी गात असलेल्या यमन रागातील विविध पदे
गायिकांनी सादर करून एक वेगळा प्रकार समोर आणला.
यावेळी संपूर्ण सभागृह प्रेक्षकांच्या गर्दीने भरले होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment