पंढरीच्या शिक्षक डॉक्टरचा विदेशात डंका.
*पंढरीच्या शिक्षक डॉक्टरांचा विदेशात डंका!*
प्रतिनिधी. पंढरपूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असणारे डॉ. प्रशांत ठाकरे यांच्या परदेशात म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमांची व विविध योजनांची माहिती जाणून घेऊन या उपक्रमांची आपल्या राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात कशी अंमलबजावणी करता येईल या अनुषंगाने डॉ. ठाकरे यांची निवड झाली आहे. या अभ्यास दौ-याचा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौ-यात डॉ. प्रशांत ठाकरे पंढरीचा नावलौकिक नक्की वाढवतील.
डॉ. ठाकरेंना यापूर्वीच येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विशेष गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्या निवडीने कलासाधनाच्या शिरपेचात आणखी एका मानाच्या तु-याची भर पडली आहे. डॉ. ठाकरेंनी दिलेले शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक देशाबरोबर परदेशातही पसरला आहे. त्यांचा दौरा यशस्वी झाल्यानंतर कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment