पुन्हा एकदा संन्यस्त खड्ग, चिन्मय कटके व सहकाऱ्यांनी पेलले शिवधनुष्य.


 पुन्हा संन्यस्त खड्ग.                                                 लग्न पहावे करून!,घर पहावे बांधून! याच धर्तीवर नाटक पहावे बसवून असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.नाटक तेही ९५ वर्षांपूर्वी चे संगीत नाटक बसवणे म्हणजे खरं तरं वेडेपणा च म्हणावा लागेल पण काही व्यक्तीच अशा असतात ज्यांना एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेले असते अशापैकी एक वल्ली म्हणजे चिन्मय कटके तो स्वतः आणि त्याच्या सवंगड्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

 स्वातंत्र्य वीर सावरकर एक तेज:पुंज अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अफाट वक्तृत्व, दैदिप्यमान आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर निर्मिलेले साहित्य प्रचंड हाल अपेष्टा सोसत असताना मेंदू कसा तल्लख राहतो हा एक चमत्कारच ! स्वातंत्र्य वीर सावरकर या़ंचे प्रखर व्यक्तीमत्व समजावून घेण्यासाठी त्यांचे लेख, कविता आणि नाटके हे साहित्य नक्कीच उपयोगी पडते . सावरकर हे प्रतिभासंपन्न नाटककार होते.रत्नागीरीतील  स्थान बध्दतेच्या काळात त्यांनी उ:शाप,(१९२७ ) संन्यस्त खड्ग (१९३१) व उत्तर क्रिया (१९३२-३३) ही नाटके लिहिली.    संन्यस्त खड्ग नाटकाचा पहिला प्रयोग बळवंत संगीत मंडळींनी १८ सप्टेंबर १९३१ रोजी मुंबई येथील एल्फिन्स्टन नाट्यमंदिरात सादर केला.     

               " संन्यस्त खड्ग" हे नाटक बौद्ध कालीन आहे.गौतम बुध्दाच्या सांगण्यावरून शाक्य सेनापती विक्रमसिंह शस्त्र त्याग करून संन्यासी होतो बुध्दाच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने प्रभावीत होऊन शाक्य जनता संन्यासी होते.शाक्य जनता शस्त्र त्याग करते.त्यामुळे राज्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते.शेजारच्या राज्याचा कोसल देशाचा राजा शाक्य राज्यावर आक्रमण करतो.विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभाच्या  नेतृत्वाखाली लढणारे शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण थोपवण्यास असमर्थ ठरते विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकि वेष धारण करून रणांगणात उतरते पण दोघांचाही शेवट सारखाच होतो अखेर त्रस्त भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात गौतम बुध्दाशी अहिंसा नैतिकता ह्यावर वाद विवाद घालून विक्रमसिंह त्याग केलेली तलवार ( खड्ग) पुन्हा धारण करून शाक्य राज्यास विजयी करतो.अहिंसाविषयक तत्वज्ञानावरील वाद विवाद व स्वातंत्र्य वीर सावरकर रचित  गीता मुळे नाटक अविस्मरणीय ठरते 

भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे यांनी दिनांक १६ मार्च २५ रोजी संन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग सादर केला सुमारे ९५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे एक प्रकारे धाडसच होते जणू काही शिवधनुष्यच पण चिन्मय कटके आणि त्याचे तरूण वेडे साथीदारांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले.

संगीत नाटकाचा आत्मा म्हणजे त्यातील संगीत आणि गाणी या मधील शत जन्म शोधताना आणि मर्मबंधातली ठेवही ही गाणी खूपच लोकप्रिय आहेत.यानाटकातील गायक कलाकार सुलोचनेच्या भूमिकेतील,   कीर्ती कस्तुरे     वल्लभाच्या भूमिकेतील.  अजिंक्य कुलकर्णी  सखीच्या भूमिकेतील ऐश्वर्या गोळे यांनी गायीलेल्या पदांमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.मूळ संगीत रामकृष्ण बुवा वझे यांचे असले तरी त्यावर योग्य ते संस्कार करून राजीवजी परांजपे यांनी बहार आणली साजेसे तबलावादन आणि आँर्गन यामुळे गाण्यांची रंगत खूपच वाढली.त्याकाळातील वातावरण निर्मिती करण्यात नेपथ्यकार यशस्वी झाले होते प्रकाश योजना आणि ध्वनी मुद्रण तंत्राचा अतिशय सुरेख वापर केल्यामुळे प्रेक्षक एकचित्त झाले होते .

चिन्मय कटके याने विक्रमसिंहाच्या प्रमुख भूमिकेला योग्य न्याय दिला सर्वच पात्रांची निवड यथोचित झाली आहे.

एक सुंदर नाट्य प्रयोग पाहायला मिळाला .

संपादक.

विनय उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.