राज्य उत्पादन शुल्क अधिकारी दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी.


 सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय..!

त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? आमदार अवताडेंचा अधिवेशनामध्ये प्रश्न


मंगळवेढा/प्रतिनिधी

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधील एका गावामध्ये चौकात असलेल्या पटांगणामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे ते पाणी नेण्यासाठी गावातील सर्व महिला चौकामध्ये येत असतात मात्र त्या आरो फिल्टर च्या बाजूला सहा अवैध दारू विक्रीची दुकाने आहेत त्यामुळे त्या अवैध दारू विक्रीच्या त्रासाला कंटाळून सर्व महिलांनी सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याची तक्रार केली होती त्या वरिष्ठ पदावर महिला अधिकारी असूनही त्यांनी महिलांच्या तक्रारीची दखल घेतली नाही तेथील अवैध दारू दुकानांचे उद्घाटन त्या गावचे उपसरपंच करत असल्याचेही वर्तमानपत्रात आले होते सध्या सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विकण्याचे परवाने अवैध मार्गाने देते की काय असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे तरी दारू विक्री त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.


चौकट

आमदार आवताडे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "कठोरात कठोर कारवाई केली जाईल" असे उत्तर दिले

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.