कट्टर हिंदुत्व आणि विवेकाचा अनोखा संगम म्हणजे अभयसिंह . ह भ. प चैतन्य महाराज देगलूरकर.


 कट्टर हिंदुत्व व विवेकाचा अनोखा संगम म्हणजे अभयसिंह यांचे व्यक्तीमत्व:ह.भ.प.चैतन्यमहाराज देेगलुकर


हिंदुत्ववादी नेते अभयसिंह इंचगावकर कुलकर्णी यांच्या एकसष्ठी गौरव सोहळा व ग्रंथतुला


पंढरपूर (प्रतिनिधी)

कट्टरता आणी विवेक एका ठिकाणी असत नाहीत असे म्हणतात मात्र अभयसिंह यांच्या कडे कट्टर हिंदुत्वा बरोबरच विवेक यांचा अनोखा संगम अभयसिंह यांच्या व्यक्तीमत्वात आहे. त्यांचा व्यासंग व अभ्यास मोठा असल्याने ते हिंदुसमाजासाठी अधिक सक्षमपणे  काम करु शकले असे प्रतिपादन निरुपणकार ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलुकर यांनी केले.हिंदुसभानेते अभयसिंह इचगावकर यांचा एकसष्ठी निमित्त सौ.वसुजा यांचेसह सपत्नीक सत्कार करण्यात आला,या प्रसंगी ,त्रिंबकेश्वर येथील महामंडलेश्वर देवबाप्पा तथा फरशीमहाराज,जेष्ठ हिंदुत्ववादी गोरक्षक मिलींद एकबोटे,हिंदु एकता आंदोलनाचे नेते हिरामणआप्पा गवळी,सुप्रसिध्द ह्दयरोग तज्ञ डॉ.गुरुनाथ परळे,मराठा महासंघाचे नेते दास शेळके,प्राचार्य आशाताई शिंदे,महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभेचे अध्यक्ष अनिलराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

ह.भ.प. चैतन्यमहाराज बोलताना पुढे म्हणाले लहानपणापासून मी अभयसिंह व त्यांच्या सहकार्‍यांच्या कामाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.त्यांचे हिंदुत्वाचे कार्य जवळून पहात आलो आहे.आज त्यांच्या भाषणातील आवाज व आवेश पाहता त्यांनी वयाची साठ वर्षे पुर्ण केली आहेत यावर माझा तरी विश्वास बसत नाही.त्यांचे स्वा.सावरकर व अनेक विषयांचा व्यासंग मोठा आहे हे त्यांच्या भाषणातून जाणवत असते.जिथे कट्टरता असते तिथे सहसा विवेक असत नाही असे म्हणतात मात्र या दोन्हीचा अनोखा संगम त्यांच्या कडे आहे.असे सांगताना त्यांनी काही वर्षापुर्वी गोरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात आपण एक प्रक्षोभक भाषण दिले होते तेव्हा सभा संपल्यावर अभयसिंह यांनी मला बाजुला घेतले व अशी प्रक्षोेभक विधाने आपण करु नकात त्यामुळे आपण अडचणीत याल आपण ज्ञानेश्वरी सांगता आहात ती महत्वाची आहे प्रक्षोभक बोलण्यासाठी आम्ही आहोत असे मला सांगितले तेव्हा कट्टर असण्या बरोबरच त्यांच्या असलेल्या विवेकाचे दर्शन मला झाले.हिंदुत्वाचे काम करीत असताना दुषण लागेल असे कोणतेही गैरकृत्य अभयसिंह यांचेकडून घडलेले नाही त्यामुळेेच आज मी व आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलो आहोत असेही चैतन्यमहाराज यांनी नमूद केले.

 हिंदुत्ववादी नेते मिलींद एकबोटे या प्रसंगी बोलताना म्हणाले हिंदुमहासभा ही हिंदुत्वाचीजननीआहे.अभयसिंह यांनीमहाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लढावु हिंदुत्वावादी कार्यकत्यार्र्ना नेत्यांना कायम मदत केली त्यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार देवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.भीमा कोरेगाव दंगली प्रसंगी माझ्यावर खोटे आरोप झाले तेव्हा अत्यंत अडचणीच्या काळात अभयसिंह अचानक प्रकटले व त्यांनी मला अर्थिक मदत केली अशी गुप्त मदत त्यांनी अनेकांना केली .प्रा.आशाताई शिंदे यांनी अभयसिंह यांचे हिंदुसभेच्या माध्यमातून केलेले काम मी गेली 40 वर्षांपासून पहात आली आहे अशा कट्टर कार्यकर्त्या ला शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे खास आले आहे असे सांगितले या प्रसंगी डॉ.गुरुनाथ परळे यांनी अभयसिंह व इंचगावकर परिवराच्या सुखद आठवणी सांगितल्या या प्रसंगी महामंडलेश्वर फरशीमहाराज यांनी आशिर्वादपर शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी प्रत्यक्ष सातारा येथे त्यांच्या व दाभोळकरांच्या अंनिस शी जो सामना झाला त्यावेळी अभयसिंह व पंढरपूर मंडळींनी प्रखर साथ दिली याबद्दल माहिती दिली.या प्रसंगी अनेक संस्था व मान्यवर व्यक्तीनी अभयसिंह यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभेच्या वतीने अध्यक्ष अनिल पवार,तिरुपती रेडडी यांनी तलवार भेट देत अभयसिंह यांचा गौरव केला.

या प्रसंगी एकसष्ठी निमित्त अभयसिंह यांची सावरकर चरित्र ग्रंथाने ग्रंथतुला करण्यात आली,तर सौ.श्रध्दा कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या गौरव स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ रश्मी कुलकर्णी गंधे यांनी अतिशर सुंदर स्वरात नुकतेच महाराष्ट्र सरकारने गौरविलेले सावरकरांचे अनादी मी अवघ्य मी अनंत मी भला हे गीत सादर केले.प्रास्ताविक ह.भ.प. शंकरमहारज बडवे यांनी केले.तर स्वागत पत्रकार महेश खिस्ते यांनी केले.तर आभार प्रदर्शन मंदार कुलकर्णी यांनी केले.अतिशय देखण्या व सुंदर कार्यक्रमास सूत्रसंचालन ही अतिशय उत्तमरीत्या विद्यावाचस्पती सौ मैत्रैयी केसकर,यांनी केले.अभयसिंह प्रेमी मंडळी व पंढरपूरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक बेणारे,विकास मोरे.प्रशांत खंडागळे,गणेश कुलकर्णी,गणेश उंडाळे,सतिष बेणारे,सौ रसिका कुलकर्णी हवालदार,डॉ.अमृता कुलकर्णी,सौ मधुरा कुलकर्णी,सौ.ऋषिका कुलकर्णी,डॉ.दुगैंश कुलकर्णी,अ‍ॅड.चैतन्य कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.