Posts

Showing posts from November, 2024

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई, १७होड्या नष्ट, १ट्रॅक्टर जप्त.

Image
 अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची  कारवाई            १७ होड्या नष्ट , एक ट्रॅक्टर जप्त                                 पंढरपूर  (प्रतिनिधी) _ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे तसेच पंढरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील  भीमा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या १७ लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट केल्या तर  अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे  यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी  प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्...

विधानसभा निवडणुकीची २५फेऱ्यातून होणार मतमोजणी.

Image
 पंढरपूर विधानसभेसाठी  14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी  215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त                                                             - निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे           * 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण                 पंढरपूर (प्रतिनिधी):  पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे 215 अधिकारी कर्मचारी तर सुरक्षेसाठी 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.            पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 59 हजार 744 मतदारांनी मतदान केलेले असून,  ...

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भगीरथ भालके यांना विजयी करा._डॉ प्रणिती भालके.

Image
 सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भगीरथ भालके यांना विजयी करा. डॉ प्रणिती  भालके. प्रतिनिधी पंढरपूर _ पंढरपूर येथील  गोरगरिबांच्या वसाहतीत अनेक समस्या असून या लोकांना जगणे अशक्य होत आहे, घरकुल तसेच गटारीच्या समस्या भगीरथ दादा आमदार झाल्यावर सोडवितील , तुम्ही केवळ मतदानरुपी आशीर्वाद द्या असे आवाहन काँगेस पक्षाचे उमेदवार काँग्रेस डॉ प्रणिती  भालके यांनी केले. त्या कालीकादेवी चौकात बोलत होत्या ,यावेळी व्यासपीठावर  , राजेंद्र उराडे,किरण घाडगे राजेश भादुले,  , गणेश अंकुशराव, दिनेश माने, शिंदे  आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ प्रणिती भालके म्हणाल्या ,  झोपडपट्टी भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदा तरी विद्यमान आमदार आले का?तुम्ही भारतनानांचा काळ आठवा गुडघाभर पाण्यात ते लोकांची विचारपूस करायला येत, मागील पोटनिवडणूकीत चुकीचा निर्णय झाला. आता तसे झाले तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही, आषाढी वारी काळात अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना प्रशासनाने जाणून बुजून त्रास दिला,त्यावेळी भगीरथ दादा धावून आले, मग करवाई थांबविली. कालीका...

कॉरिडॉर रद्द करायचा असेल तर काँगेस पक्षाला मते द्या._डॉ प्रणिती भालके.

Image
 कॉरीडोर नको असेल तर काँगेसला मते द्या._डॉ प्रणिती भालके. पंढरपूर(प्रतिनिधी) मंदिर परिसरातील घरे, वाडे, दुकाने वाचवायची असतील तर काँगेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करा असे आवाहन डॉ प्रणिती भालके यांनी पश्चिमद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर प्रचारसभेत केले. यावेळी महमंद उस्ताद, ॲड राजेश भादुळे, गणेश अंकुशराव, सागर बडवे, राजेंद्र उराडे, दिनेश माने, रविंद्र सोनलकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढें बोलताना डॉ प्रणिती भालके म्हणाल्या, मागे आपण चुकीचा आमदार निवडला, हा आमदार लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत नाही, मंदिर आहे म्हणुन व्यापार आहे, हा आमदार कॉरिडॉर रद्द करणार नाही, उलट तोच ठेकेदार असणार आहे, भगीरथ दादा आमदार झाल्यास कुणालाही ईजा होणार नाही, लोकांची घरे, दुकाने मास्टरप्लॅन किंवा कॉरिडॉर मध्ये जाणार नाहीत, यावेळी ॲड भादुले, महमंद उस्ताद, गणेश अंकुशराव, सागर बडवे यांची भाषणे झाली. बडवे उत्पात व सेवाधारी यांचे पूजेचे अधिकार परत देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, स्थानिक लोकांना आधी दर्शन, भ्रष्ट समिती अध्यक्ष, सदस्य यांची हकालपट्टी करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्य...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला कार्तिकी वारीत ३कोटी ५७लाखांचे उत्पन्न.

Image
 *मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न;*   *कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.*         पंढरपूर ( प्रतिनिधी)  माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरत असतात. कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा 12 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या यात्रा कालावधीत मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून  3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.   श्रींच्या चरणाजवळ रू.4141314/- (रू.4015667/-), भक्तनिवास रू.4448581/- (रू.6662377/-), देणगी रू.11460362/- (रू.12892371/-), लाडूप्रसाद रू.6064620/- (रू.6249000/-), पूजा रू.1072681/- (रू.407000/-) सोने चांदी भेट रू.504015/- (रू.836254/-), दानपेटी रु.7356104/- (रु.15721527/-) व इतर रू.699645/- (रू.924072/-) असे एकूण रू.35747322/- (रू.47708268/-) असा उत्पन्नाचा तपशिल आहे. कंसात मागील वर्षाची आकडेवारी आहे.  यामध्ये प्रामुख्याने सुमारे 6 लाख बुंदी लाडू प्रसादाची विक्री झाली आहे. तसेच देणगी व इतर ...

अनिल सावंत हे माळकरी असून कारभार पारदर्शक आहे._खासदार सुप्रिया सुळे.

Image
 अनिल सावंत हे माळकरी असुन कारभार पारदर्शक आहे._खासदार सुप्रिया सुळे. पंढरपूर (प्रतिनिधी) मंगळवेढा  येथे  विधानसभा निवडणुकीचे महविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची भव्य प्रचारसभा  आठवडा बाजार येथे रविवार दिनांक १७रोजी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ. सुप्रियाताई सुळे यांची जंगी जाहीर सभेत सडेतोड भाष्य केले.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत सुप्रियाताई यांनी राज्यातील महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, हवालदिल झालेला शेतकरी या सर्वच मुद्यांवर महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या हि संतांची संस्कारांची भूमी आहे, ईथे कुणावरही अन्याय होणार नाही, अनिल सावंत हा नवीन चेहरा आहे, त्यांचा कारभार पारदर्शक आहे, ते माळकरी असून आचरण शुद्ध आहे, आपले सरकार स्वाभिमानी,  गरीब लोकांचं सरकार आहे, हे सरकार साखर कारखाना बंद पडू देणार नाही. दूध आणि शेतमालाला चांगला भाव दिला जाईल, या राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार यांनी व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिली. या सगळ्यांना न्याय...

भाविकांची फसवणूक करणाऱ्या तोतया सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल.

Image
 सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांची फसवणूक करणारा तोतया इसमावर गुन्हा दाखल मंदिर समितीकडून करण्यात आला गुन्हा दाखल  पंढरपूर (प्रतिनिधी) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात शंकर चनाप्पा भोसले हा इसम मंदिर समितीच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा पेहराव घालून भाविकांकडून पैसे घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन देतो असे सांगून भाविकांची फसवणूक करताना दिसून आल्याने त्याच्यावर मंदिर समिती मार्फत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दिनांक १७नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दर्शनरांगेतील स्थानिक नागरिक / दुकानदार मीनाक्षी जोशी यांना एक इसम, कासार घाट येथे दर्शनबारीत संशयरीत्या तिथे उभा असल्याचा दिसून आला व तो भाविकांना तुम्हाला दर्शन करून देतो, असे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेत असताना निदर्शनास आल्याने, त्यांनी मंदिर समितीचे तेथील कर्मचारी रोहित दगडू जानगवळी व ऋतिक कल्याण काळे यांना कळवले. तदनंतर माहिती घेऊन संबंधित इसम शंकर चन्नप्पा भोसले रा. रांजणी ता. पंढरपूर यांचेवर मंदिर समितीचे सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम मारुती ढगे यांनी पंढरपूर शहर पोली...

मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आहे._जयंत पाटिल.

Image
 मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आहे._ प्रांताध्यक्ष जयंत पाटील  पंढरपूर (प्रतिनिधी)       आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आली आहे. येत्या वीस तारखेला तुतारी च्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर येथील अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत मतदारांना केले.     यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लक्ष्मण ढोबळे सर, सुभाष भोसले, संदीप माडवे, सुधीर भोसले, संतोष नेहतराव, सुधीर अभंगराव, प्रताप गंगेकर, वसंत नाना देशमुख, अमर सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.     मंगळवेढा तालुक्यातील चौतीस गावाला पाणी मिळावे म्हणून आमच्या सरकारच्या राजवटी मध्ये आमदार भालके यांनी केलेल्या प्रयत्नाला आम्ही दुजोरा देऊन या मंगळवेढा तालुक्यातील गावाना मंजूरी व निधी दिला याचे क्रेडीट विरोधक घेत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला कोट्यावधीचा निधी आम्ही दिला. या पुढील काळात...

विकासाची दृष्टी नसणाऱ्याना विकासनिधीचे महत्त्व काय समजणार _समाधान आवताडे.

Image
 विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं  कळणार -आ समाधान आवताडे पंढरपूर  (प्रतिनिधी)- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी आणू शकलो परंतु झालेल्या विकास कामांच्या निधीवर अर्थहीन भाष्य करणाऱ्यांना विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यामुळे त्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार असा टोला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा व महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी या ब्रह्मपुरी, उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगांव, ढवळस, शरदनगर, देगांव, घरनिकी या गावांमध्ये प्रचार सभा पार पडल्या त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या अगोदर निवडणुका जवळ आल्या की, दुष्काळ व पाणी प्रश्नावर बोलले जात होते. परंतु मी आमदार झाल्यापासून पाण्याच्या जवळपास सर्व योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. मी फक्त बोलत नाही तर ते करूनच दाखवतो. येत्या वर्ष...

सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा._ज्योतीताई कुलकर्णी.

Image
 *शेतकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा* - नितीन कापसे सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना साथ द्या* - ज्योतीताई कुलकर्णी (अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा मतदार संघातील नागरिकांचा  निर्धार)    पंढरपूर (प्रतिनिधी )  सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारे आणि माढ्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार माढा मतदार संघातील जनतेने केला असल्याचे प्रगतीशील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी सांगितले. माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना अभिजीत पाटील यांना मतदार संघातील प्रमुख नेते मंडळी आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. केवड, बुद्रुकवाडी, धानोरे, कापसेवाडी, वाकाव, उपळाई खुर्द, वडाचीवाडी, रोपळे खुर्द, उपळाई बुद्रुक, अंजनगाव खेलोबा या ठिकाणी गावात प्रचार दौरा पार पडला.. आधी केले मग सांगितले या उक्ती प्रमाणे अभिजीत पाटील या...

तामिळनाडू येथील आमदारांनी घेतले श्री विठुरायाचे दर्शन.

Image
 तामिळनाडू येथील आमदारांनी घेतले विठुरायाचे दर्शन.  पंढरपूर (प्रतिनिधी)_ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा तथा तामिळनाडू राज्यातील कोइंम्बतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ.वनाथी ताई श्रीनिवासन यांनी शुक्रवार दी १५नोव्हेंबर रोजी पंढरपूर मध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन  घेतले. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा शहराध्यक्ष  डॉ.ज्योती शेटे यांच्या घरी अतिशय उत्कृष्ट अशा नाश्त्याचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर पंढरपुरातील अत्यंत प्राचीन असे ताकपिठे विठोबाचे दर्शन घेतले व पुढच्या दौऱ्यामध्ये पांडुरंगाला तुळशी अर्चन करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यानंतर विद्यमान आमदार व भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मोर्चा सौ.वनाथी ताई श्रीनिवासन यांनी यांनी प्रभाग क्र.१० मधील बूथ क्र.६२ या ठिकाणी जाऊन भाजी विक्रेत्या महिला त्याचबरोबर कामगार महिला यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र भाई मोदी यांनी, महिलां साठीच्या योजना चालू केल्या ज्याच्या माध्यमातून महिलांचे सशक्तिकरण झालेलं आहे आणि भविष्यकाळ हा महिलांच्यासाठी अति...

आमदार झाल्यावर गोरगरीब जनतेच्या सर्व समस्या सोडविणार._भगीरथ भालके

Image
 मी आमदार झाल्यावर गोरगरीब जनतेच्या सर्व समस्या सोडविणार. _भगीरथ भालके. प्रतिनिधी पंढरपूर _ पंढरपूर येथील  गोरगरिबांच्या वसाहतीत अनेक समस्या असून या लोकांना जगणे अशक्य होत आहे, घरकुल तसेच गटारीच्या समस्या मी आमदार झाल्यावर सोडवितो, तुम्ही केवळ मतदानरुपी आशीर्वाद मला द्या असे आवाहन काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले. गुरुवार दिनांक १४रोजी ज्ञानेश्वर नगर येथे काँगेस पक्षाचा वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  माजी नगरसेवक संजय बंदपट्टे, किरण घाडगे, ॲड राजेश भादुले, युवा नेते श्रीनिवास उपळकर , माजी उप नगराध्यक्ष सुधीर धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भालके म्हणाले, या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदा तरी विद्यमान आमदार आले का?तुम्ही भारतनानांचा काळ आठवा गुडघाभर पाण्यात ते लोकांची विचारपूस करायला येत, मागील पोटनिवडणूकीत चुकीचा निर्णय झाला. आता तसे झाले तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही, आषाढी वारी काळात अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना प्...

जनतेच्या पुण्याईवर अभिजित पाटील हेच विजयी होतील._खासदार ओमराजे निंबाळकर पाटील.

Image
 *७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले* : खा.ओमराजे निंबाळकर  *जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील* : खासदार ओमराजे निंबाळकर  (राजाभाऊ चवरे,कुर्मदास कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे, अमरसिंह साठे व जामगावचे सरपंच सोनाली सरवदे, बुद्रुकवाडीचे सरपंच पूजा माने यांनी जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला) पंढरपूर /प्रतिनिधी माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की; पंतप्रधानांनी अजितदादांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं. ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल ...

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवितो._अभिजीत पाटील.

Image
 *शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो* - अभिजीत पाटील (उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन, आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली) *कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही* - अभिजीत पाटील पंढरपूर(/प्रतिनिधी) घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे 'विठ्ठल'चा चेअरमन झालो. या काळात ज्या-ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, त्या सर्व प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. इथून पुढच्या काळातही तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या, मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवतो, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी दिले. बुधवारी अभिजीत आबा पाटील यांनी माढा मतदार संघास जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करोळे, जळोली, सांगवी, बादलकोट, नेमतवाडी, पेहे, नांदोरे, आव्हे, तरटगाव, या गावांचा प्रचारदौरा करून सायंकाळी उंबरे व रोपळे येथे जाहीर सभा घेतल्या. उंबरे येथील जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्य...

पंढरपूर येथील डॉ काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व निवारण चिकित्सा शिबिराचे आयोजन.

Image
 डॉ काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व निवारण, चिकित्सा शिबिराचे आयोजन. पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर येथील डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आज दी १४ते १६नोव्हेंबर या कालावधीत मोफत वंध्यत्व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मासिक पाळीच्या तक्रारी, पी सी ओ डी, बंद गर्भनलिका, स्त्री बीज ग्रंथी, गर्भाशयातील गाठी, वारंवार होणारा गर्भपात, आय व्हीं एफ, आय यू आय, शुक्राणू नसणे, शुक्राणू कमी असणे, शुक्राणूना गती नसणे, लैंगिक समस्या यावर उपचार, मोफत मार्गदर्शन  सवलतीच्या दरात विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. टेस्ट ट्यूब बेबी, वीर्य तपासणी,सोनोग्राफी, रक्त तपासणी, लॅपरोस्कॉपी, हिस्टरोस्कोपी आदि सवलतीच्या दरात केले जाणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी, निपुत्रिक दांपत्य यांच्यासाठी हि सुवर्णसंधी असून अपत्यप्राप्ती नेसलेल्या जोडप्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शकते. डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन हजारो जोडप्यांना मातृत्व लाभले आहे, या हॉस्पिटलचा नाव लौकिक परराज्यात देखील असून क्लिष्ट गुंतागुतीतही यशस्वी रिझल्ट आहेत. या संधीचा लाभ गरज...

राज्यातील सत्तर लाख रामोशी बेरड समाज महायुतीच्या पाठीमागे._दौलत नाना शितोळे.

Image
 राज्यातील सत्तर लाख रामोशी बेरड समाज  महायुतीच्या  पाठीमागे._ उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे.  पंढरपूर (प्रतिनिधी)_महाराष्ट्र राज्यातील ७०लाख बेरड रामोशी समाज हा महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे. अशी माहिती उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पंढरपूर येथे बुधवार दि.१३नोव्हेंबर रोजी सकाळी ११: ३०वा. के बी पी कॉलेज चौक येथील हॉटेल राधेश मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले रामोशी समाजातील महापुरुषांना गाडण्याचे काम काँगेस व राष्ट्रवादी काँगेस पक्षाने केलें आहे. मात्र महायुती ने आमच्या रामोशी समाजातील महापुरुषांना उजेडात आणण्याचे काम केले आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील ५१मतदासंघांत महायुतीच्या उमेदवारांना साथ देऊ, कारण देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ७५वर्षापासून प्रलंबित असलेल्या १५प्रमूख मागण्या गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने पुर्ण केल्या आहेत. सरकारी कॉलेजना  समाजातील ५महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. रामोशी बेरड समाजाकडे  इमानदारी या व्यतिरिक्त दु...

शेताच्या बांधावर जाऊन अभिजीत पाटील यांचा प्रचार.

Image
 अभिजीत पाटील यांची प्रचारात आघाडी. (जाहीर सभा, गावभेट दौरे आणि होम टू होम प्रचाराबरोबरच शेताच्या बांधावर जाऊन प्रचार) पंढरपूर( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून गावभेट दौरे, राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि होम टू होम प्रचाराबरोरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जावून शेतकऱ्यांना विकासाचे व्हिजन सांगत आहेत. त्यामुळे 'आपला माणूस' म्हणून मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे. अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना लोकशाही मार्गाने ताब्यात घेतला त्याच वेळी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागील तीन महिन्यात माढा मतदारसंघात खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर, माढा कुस्ती केसरी, दहीहंडी, रक्तदान शिबिर, बैलगाडा शर्यत, आदी कार्यक्रम घेऊन आपले नाव घराघरात पोहचवले व कसल्याही परिस्थितीत माढ्याच्या रिंगणात उतरायचेच असे ठरवले. त्यातूनच जनमताचा कौल असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात यश मिळवत अर्धी लढाई जिंकली. साहजिकच प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कट्टर विर...

महाराष्ट्र धर्म जपण्याची हि निवडणुक._खा.अमोल कोल्हे.

Image
 *जनता दिल्लीच्या तक्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल* : खासदार अमोल कोल्हे *महाराष्ट्र धर्म जपण्याची हि  निवडणूक* : खासदार अमोल कोल्हे *४२ गावातील जनता मला कधीही परकं पाडणार नाही* : अभिजीत पाटील  (अभिजीत पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या आमदार होणार; खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास) पंढरपूर /प्रतिनिधी  माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा करकंब येथे संपन्न झाली.   यावेळी यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, मा. जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे , शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे नितीन नागणे, ज्योती कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, बाबूतात्या सुर्वे, विष्णू भाऊ बागल, सुधीर भोसले, विजय भगत, करकंबचे जेष्ठ दिलीप पुरवत बी.एस पाटील, अमोल शेळके, खरे गुरुजी यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प...

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी सोडवून पाणी, शिक्षण, रस्ते या समस्यांवर मात करणार._अनिल सावंत.

Image
 शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार--अनिल सावंत पंढरपूर(प्रतिनिधी) अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा निमित्ताने गावांना भेट दिली असता गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. देशाचे नेते शरद पवार साहेब यांना केंद्रीय कृषिमंत्री असताना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या काय अडीअडचण असतात याची त्यांना जाण असल्याने पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून  या भागातील पाणी प्रश्न दूर करून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करण्याची गरज आहे आणि याबाबत मी सर्वप्रथम जातीने लक्ष देऊन या भागाचे नंदनवन करण्याचा माझा मानस असून येत्या निवडणुकीत असंच सहकार्य करून ' तुतारी वाजवणारा माणूस ' या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन अनिल सावंत यांनी ग्रामस्थांना केले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने केला. संपर्क...

यंदा जनताच बदल घडवून प्रस्थापितांना धडा शिकवेल._अभिजीत पाटिल.

Image
 यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल: अभिजीत पाटील (बाईक रॅली काढून अभिजीत पाटील यांचे पांढरेवाडी येथे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत) पंढरपूर (प्रतिनिधी)   माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर, पांढरेवाडी, जाधववाडी, वरवडे, वाफेगाव, वाघोली, लवंग, महाळूंग या गावांना आहे भेट दिली. यावेळी मेंढापूर ते पांढरेवाडी दरम्यान अभिजीत पाटील यांचे बाईक रॅली काढून ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की माझ्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन मी आपल्या समोर आलो आहे.  मी सत्ता मिळावी म्हणून आपल्यासमोर उभा नाही तर परिवर्तनासाठी आपल्यासमोर आलो आहे असे आवाहन करत. ते पुढे बोलताना म्हणाले की प्रदीर्घकाळ सत्तेत राहूनही प्रस्थापितांना माढा मतदार संघातील नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा पुरविता आल्या नाही हे दुर्दैव आहे. म्हणूनच आदरणीय पवार साहेबांनी माढा मतदार संघातील जनेतेच्या मनातील ओळ...

संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा.

Image
 संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा. अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर शिंदेंना धक्का. (प्रमुख उपस्थित: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील) पंढरपूर (प्रतिनिधी ) संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाला मतदारांची मोठी पसंती असून या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांना रोज अनेक दिग्गज नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. तसेच त्यांच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. माढा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून बबनराव शिंदे यांच्या यांचे पुत्र श्री रणजीत शिंदे यांना प्रचारात पिछाडीवर सोडले आहे. अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अरण येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कोकाटे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनी...

मतदारांचा कौल माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील हेच आमदार होणार.

Image
 *माढ्याच्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या अभिजीत पाटील यांना मतदारांची साथ* *मतदारांचा कौल अभिजीत पाटीलच आमदार होणार विधानसभेमध्ये शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तोफ डागणार* *अभिजीत पाटील यांच्या मतदारसंघात झंजावात दौरा* *अनेकांनी केले पक्षप्रवेश : अभिजीत पाटलाची ताकद वाढली सरपंच, विकास सोसायटीच्या चेअरमननी दिली साथ* पंढरपूर /प्रतिनिधी  माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी परीते,अकोले बु आहेरगाव, भुईंज, पालवन, अंकुबी, भटुंबरे, नारायण चिंचोली, ईश्वर वठार या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की ही निवडणूक कारखान्याची नसून विधानसभेची आहे. विद्यमान आमदारांनी ऊस आणि पाण्यावरच राजकारण केले. यामुळे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करूनही तीस वर्षात कोणतीही विकास कामे झाली नाही असा आरोप करत त्यांनी मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. दर्जेदार आरोग्य स...

भाविकांच्या सोयीसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना.

Image
 भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना                                                              - प्रांताधिकारी सचिन इथापे                  पंढरपूर (प्रतिनिधी ) कार्तिकी यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती  तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे.  यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. भाविकांना  काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा असे आवहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.   कार्तिक वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक...

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश.

Image
 बातमी                                                                                                        दि.०९/११/२०२४    स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अंतर्गत  झालेल्या विद्यापीठ स्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून बक्षिसे पटकाविली. आता या विजेत्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.       छत्रपती शिवाजी महाविद्यालय, बार्शी या ठिकाणी झालेल्या आंतर महाविद्यालय स्...

काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा.

Image
 भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा... पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा.. पंढरपूर(प्रतिनीधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.  काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. काँग्रेसआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबरला विठ्ठल इन कार्यालय, स्टेशन रोड, पंढरपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला गेला.  काँगेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिं...

के बी पी कॉलेज मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

Image
के बी पी कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांनी भरविला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा. प्रतिनिधी पंढरपूर _महाविद्यालयीन जीवनातील काळ, म्हणजे आयुष्यातील सर्वांत सोनेरी दिवस, तारुण्याची नवीन उमेद घेऊन विद्यार्थी,विद्यार्थिनी नवीन आयुष घडविण्यासाठी  अध्ययन करीत असतानाच फुलपाखरा सारखे स्वच्छंदी आनंदी जीवन जगत असतात, याच सोनेरी दिवसांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील २०१३मधील माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात गेट टुगेदर म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा केला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक यांच्या समवेत पुन्हा त्या रमणीय दिवसांना  उजाळा देण्यात आला. आज कुणी शासकीय सेवेत, तर कुणी मोठा उद्योजक,काही प्रायव्हेट जॉब मध्ये करिअर घडवीत आहेत. यावेळी चहा, नाश्ता, भोजन याची व्यवस्था हॉटेल चतुर्थी येथे आयोजित करण्यात आली होती. विनोदी किस्से,स्वभावातील गमती जमती यांनी माजी विद्यार्थी खळखळून हसत होते. विवीध क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी एकमेकांना लागेल ते सहाय्य, सहकार्य करण्यास  सज्ज झाले असून दरवर्षी असेच स्नेहसंमेलन घेण्याचा मानस व्यक्...

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८२लाख २४हजारांची दारू केली जप्त.

Image
 राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांच्या कारवाईत 82 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 159 गुन्हे नोंद :27 वाहनांसह मुद्देमाल जप्त                                                             - राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव सोलापूर, (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क,विभागाच्या भरारी पथकांकडून  जिल्हयात  अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक आदी प्रकरणात कारवाई करुन 159 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये 82 लाख 24 हजार 567 रुपये किंमतीचा 27 वाहनांसह दारू बंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.            या पथकामार्फत  दि.05नोव्हेंबर 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, व दुय्यम निरीक्षक कुर्डुवाडी  पथक क्र. .1 व 2  ...

रांजणी येथे प्रचाराचा नारळ फोडून अभिजीत पाटील यांचा प्रचारास शुभारंभ.

Image
 *विठ्ठल कारखान्याचा सभासद हा औदुंबर आण्णा आणि शरद पवार यांच्याच विचाराच्या पाठीशी कायम उभा आहे* - खासदार धैर्यशील मोहिते-पाटील  *रांझणी (भिमानगर) येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ* पंढरपूर (प्रतिनिधी:) महाविकास आघाडी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल रांझणी भिमानगर ता. माढा येथून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी खा.धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद हा कैलासवासी औदुंबर आण्णा पाटील आणि शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या पाठीशी कायम उभा राहिलेला आहे त्याच विचारांवर अभिजीत पाटील यांच्यासोबत देखील उभा राहील असा ठाम विश्वास आहे.लोकसभेला जेवढे लिड मला दिले आहे त्यापेक्षा डबल मतांनी अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.      यावेळी बोलताना शिवतेजसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, विजयदादा व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी...

भा ज प उमेदवार समाधान आवताडे यांचा गावोगावी प्रचाराचा धडाका.

Image
 भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा  पंढरपूर  प्रतिनिधी- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने एवढा तालुक्यातील खालील गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे. सकाळी ८.३० वाजता हिवरगांव, ९.३० वाजता खोमनाळ, १०.१५ वाजता भाळवणी, ११.१५वाजता निंबोणी, १२.१५ वाजता चिक्कलगी, १.०० वाजता मारोळी, दुपारी ३.००वाजता शिरनांदगी, ३.४५ वाजता सिद्धनकेरी, ४.३० वाजता जालिहाळ, सायं.५.१५ वाजता हाजापूर, ६.०० वाजता डोंगरगाव, सायं.७.००वाजता रड्डे असा हा प्रचार दौरा संपन्न होणार आहे. आमदार समाधान आवताडे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार समाधान आवताडे यांची भाजपा व महायुतीचे उमेदवारी घोषित केली आहे. रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण इत्यादी मूलभूत आणि पायाभूत विकास बाबींमध्ये त्...

मनसे चे दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची दि ६नोव्हेंबर रोजी तोफ धडाडणार.

Image
 मनसेचे दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे  यांची ६नोव्हेंबरला मंगळवेढा येथे तोफ धडाडणार. पंढरपूर / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक ६नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे  सायंकाळी पाच वाजता   शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलीप धोत्रे हे नेहमीच धावून येतात. ऐन कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी क्वारंनटाईन  सेंटर उभे करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. ऑक्सिजन पुरवठा सूरू केला. स्वखर्चाने वैकुंठ स्मशानभूमीत दुरुस्ती करून स्थानिकांची सोय केली, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला, भगिनिसाठी मोफत टिळक स्मारक मंदिर येथे दिवाळीत विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यास प्रोत्साहन दीले, याचा लाभ शेकडो भगिनींनी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यानी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांच...