मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आहे._जयंत पाटिल.
मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आहे._ प्रांताध्यक्ष जयंत पाटील
पंढरपूर (प्रतिनिधी)
आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आली आहे. येत्या वीस तारखेला तुतारी च्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर येथील अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत मतदारांना केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लक्ष्मण ढोबळे सर, सुभाष भोसले, संदीप माडवे, सुधीर भोसले, संतोष नेहतराव, सुधीर अभंगराव, प्रताप गंगेकर, वसंत नाना देशमुख, अमर सुर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील चौतीस गावाला पाणी मिळावे म्हणून आमच्या सरकारच्या राजवटी मध्ये आमदार भालके यांनी केलेल्या प्रयत्नाला आम्ही दुजोरा देऊन या मंगळवेढा तालुक्यातील गावाना मंजूरी व निधी दिला याचे क्रेडीट विरोधक घेत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला कोट्यावधीचा निधी आम्ही दिला. या पुढील काळात अनिल सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अनिल सावंत यांना विजयी करा. या मतदार संघातील सर्व विकास कामे पूर्ण केली जातील.
भाजपा देशामध्ये जातीजाती, हिंदू मुस्लीम यांच्या मध्ये वैरत्वाची भावना वाढीचे काम करीत आहेत. बटेगे तो कटेगे अशी घोषणा भाजपाच्या एका मुख्यमंत्री ने केली. अशा घोषणा म्हणजे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे आहे. पडेंगे तो आगे बढेंगे ही घोषणा आमची आहे. सर्वधर्म समभाव ही आपल्या देशाच्या घटनेमध्ये लिहले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविदाने रहावे ही संकल्पना आपल्या देशाची आहे. असे असताना भाजपा देशातील जनतेमध्ये दुही निर्माण करु पहात आहे. अशा लोकांना मतदानाच्या रुपाने सत्तेतून दूर केले पाहिजे. आता या लोकांना दूर करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे. तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून अनिल सावंत यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ पंढरपूर या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, पक्षाचे उमेदवार अनिल पाटील,प्रा. लक्ष्मण ढोबळे, , पक्ष निरीक्षक शेखर माने , रवी पाटील,जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख साहेब, सुभाष भोसले, अमर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई शिवपुरे, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे, डॉ श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत. भगीरथ भालके यांनी पवार साहेबांकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. मात्र पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा अगोदरच, त्यांनी वेगळी भूमिका घेतली. हा पवार साहेबांचा अपमान आहे. त्यामुळे या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची ही वेळ आल्याचं मत जयंत पाटील साहेबांनी मांडले.
सोबतच अनिल सावंत यांना पवार साहेबाचे आशीर्वाद असल्याचं सांगत, साहेबांनी विजयाची खात्री दिली.
देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी संतप्त आहे. मात्र या मूलभूत समस्यांकडे बघायला भाजपला वेळ नाही. भाजप फक्त जाती धर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, बटेंगे तो कटेगे त्यांना सांगितलं पाहिजे. बटेंगे तो कटेंगे नाही, पढेंगे तो बचेंगे.
म्हैसाळच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडविणार. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आमचेच सरकार सोडवणार, असे ते म्हणाले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment