सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भगीरथ भालके यांना विजयी करा._डॉ प्रणिती भालके.


 सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भगीरथ भालके यांना विजयी करा.

डॉ प्रणिती  भालके.

प्रतिनिधी पंढरपूर _

पंढरपूर येथील

 गोरगरिबांच्या वसाहतीत अनेक समस्या असून या लोकांना जगणे अशक्य होत आहे, घरकुल तसेच गटारीच्या समस्या भगीरथ दादा आमदार झाल्यावर सोडवितील , तुम्ही केवळ मतदानरुपी आशीर्वाद द्या असे आवाहन काँगेस पक्षाचे उमेदवार काँग्रेस डॉ प्रणिती  भालके यांनी केले.

त्या कालीकादेवी चौकात बोलत होत्या ,यावेळी व्यासपीठावर

 , राजेंद्र उराडे,किरण घाडगे राजेश भादुले,  , गणेश अंकुशराव, दिनेश माने, शिंदे  आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ प्रणिती भालके म्हणाल्या ,  झोपडपट्टी भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदा तरी विद्यमान आमदार आले का?तुम्ही भारतनानांचा काळ आठवा गुडघाभर पाण्यात ते लोकांची विचारपूस करायला येत,

मागील पोटनिवडणूकीत चुकीचा निर्णय झाला.

आता तसे झाले तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही,

आषाढी वारी काळात अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना प्रशासनाने जाणून बुजून त्रास दिला,त्यावेळी भगीरथ दादा धावून आले, मग करवाई थांबविली.

कालीकादेवी चौक आणि भालके कुटुंबीयांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे.

निवडणुका जवळ आल्याने 

लाडकी बहीण योजना या सरकारने आणली. वाढत्या महागाईने कुटुंब उध्वस्त होत आहे.गोडेतेल, डाळी, साखर, गॅस सर्व महाग केले आहे. आता काँगेस महिलांना तीन हजार तर युवकांना चारहजार , शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपये कर्जमाफी,

मुलींना मोफत एस टी प्रवास , शासनाचे विमा कवच अशा लोककल्याणकारी योजना येणार आहेत.

यावेळी  गणेश अंकुशराव,  मोहंमद उस्ताद,किरण घाडगे,  , ॲड राजेश भादुले यांनी मनोगत व्यक्त करून भालके यांना विजयी करण्यासाठीं आवाहन केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.