कॉरिडॉर रद्द करायचा असेल तर काँगेस पक्षाला मते द्या._डॉ प्रणिती भालके.
कॉरीडोर नको असेल तर काँगेसला मते द्या._डॉ प्रणिती भालके.
पंढरपूर(प्रतिनिधी) मंदिर परिसरातील घरे, वाडे, दुकाने वाचवायची असतील तर काँगेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करा असे आवाहन डॉ प्रणिती भालके यांनी पश्चिमद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर प्रचारसभेत केले.
यावेळी महमंद उस्ताद, ॲड राजेश भादुळे, गणेश अंकुशराव, सागर बडवे, राजेंद्र उराडे, दिनेश माने, रविंद्र सोनलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढें बोलताना डॉ प्रणिती भालके म्हणाल्या, मागे आपण चुकीचा आमदार निवडला, हा आमदार लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत नाही, मंदिर आहे म्हणुन व्यापार आहे, हा आमदार कॉरिडॉर रद्द करणार नाही, उलट तोच ठेकेदार असणार आहे, भगीरथ दादा आमदार झाल्यास कुणालाही ईजा होणार नाही, लोकांची घरे, दुकाने मास्टरप्लॅन किंवा कॉरिडॉर मध्ये जाणार नाहीत,
यावेळी ॲड भादुले, महमंद उस्ताद, गणेश अंकुशराव, सागर बडवे यांची भाषणे झाली.
बडवे उत्पात व सेवाधारी यांचे पूजेचे अधिकार परत देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, स्थानिक लोकांना आधी दर्शन, भ्रष्ट समिती अध्यक्ष, सदस्य यांची हकालपट्टी करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment