राज्यातील सत्तर लाख रामोशी बेरड समाज महायुतीच्या पाठीमागे._दौलत नाना शितोळे.
राज्यातील सत्तर लाख रामोशी बेरड समाज
महायुतीच्या पाठीमागे._
उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे.
पंढरपूर (प्रतिनिधी)_महाराष्ट्र राज्यातील ७०लाख बेरड रामोशी समाज हा महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे.
अशी माहिती उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पंढरपूर येथे बुधवार दि.१३नोव्हेंबर रोजी सकाळी ११: ३०वा. के बी पी कॉलेज चौक येथील हॉटेल राधेश मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले
रामोशी समाजातील महापुरुषांना गाडण्याचे काम काँगेस व राष्ट्रवादी काँगेस पक्षाने केलें आहे.
मात्र महायुती ने आमच्या रामोशी समाजातील महापुरुषांना उजेडात आणण्याचे काम केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ५१मतदासंघांत महायुतीच्या उमेदवारांना साथ देऊ, कारण देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ७५वर्षापासून प्रलंबित असलेल्या १५प्रमूख मागण्या गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने पुर्ण केल्या आहेत.
सरकारी कॉलेजना समाजातील ५महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.
रामोशी बेरड समाजाकडे
इमानदारी या व्यतिरिक्त दुसरे काही नाही, हेच आमचे धन , हीच इमानदारी आम्हीं महायुती व घटक पक्षांना देणार आहोत,
पंढरपूर,इंदापूर मंगळवेढा,सांगोला,शिरूर, माढा,बारामती, दौंड करमाळा, जत तसेच सांगली व सातारा जिल्ह्यात भागातील दौरा करुन महायुती विजयासाठी प्रयत्न करणार आहोत.यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष माऊली हळणवर , विश्रांती भुसनर आदि पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment