के बी पी कॉलेज मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

के बी पी कॉलेज मधील माजी विद्यार्थ्यांनी भरविला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.

प्रतिनिधी पंढरपूर _महाविद्यालयीन जीवनातील काळ, म्हणजे आयुष्यातील सर्वांत सोनेरी दिवस, तारुण्याची नवीन उमेद घेऊन विद्यार्थी,विद्यार्थिनी नवीन आयुष घडविण्यासाठी  अध्ययन करीत असतानाच फुलपाखरा सारखे स्वच्छंदी आनंदी जीवन जगत असतात, याच सोनेरी दिवसांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील २०१३मधील माजी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात गेट टुगेदर म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक यांच्या समवेत पुन्हा त्या रमणीय दिवसांना 

उजाळा देण्यात आला.

आज कुणी शासकीय सेवेत, तर कुणी मोठा उद्योजक,काही प्रायव्हेट जॉब मध्ये करिअर घडवीत आहेत.

यावेळी चहा, नाश्ता, भोजन याची व्यवस्था हॉटेल चतुर्थी येथे आयोजित करण्यात आली होती. विनोदी किस्से,स्वभावातील गमती जमती यांनी माजी विद्यार्थी खळखळून हसत होते.

विवीध क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी एकमेकांना लागेल ते सहाय्य, सहकार्य करण्यास 

सज्ज झाले असून दरवर्षी असेच स्नेहसंमेलन घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

यावेळी सोनाली देशमुख, सुप्रिया देशमुख, अतुल फराटे, पांडूरंग शेंडगे, शंकर सुरगूळे, पायल जाधव, कोमल पवार, स्वप्निल पडवळे, पांडूरंग खताळ, प्राजक्ता देशपांडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

 

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.