मनसे चे दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची दि ६नोव्हेंबर रोजी तोफ धडाडणार.
मनसेचे दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची ६नोव्हेंबरला मंगळवेढा येथे तोफ धडाडणार.
पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक ६नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे सायंकाळी पाच वाजता शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलीप धोत्रे हे नेहमीच धावून येतात. ऐन कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी क्वारंनटाईन
सेंटर उभे करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले.
ऑक्सिजन पुरवठा सूरू केला. स्वखर्चाने वैकुंठ स्मशानभूमीत दुरुस्ती करून स्थानिकांची सोय केली, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला,
भगिनिसाठी मोफत टिळक स्मारक मंदिर येथे दिवाळीत विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यास प्रोत्साहन दीले, याचा लाभ शेकडो भगिनींनी घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यानी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
त्यांनी प्रचाराचा धडाका चालवला असून आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विकासकामे व दूरदृष्टी यावर दिलीप बापू धोत्रे यांनी विश्वास दाखवित
जनतेची निष्काम सेवा करण्याचा विडा उचलला आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment