अनिल सावंत हे माळकरी असून कारभार पारदर्शक आहे._खासदार सुप्रिया सुळे.
अनिल सावंत हे माळकरी असुन कारभार पारदर्शक आहे._खासदार सुप्रिया सुळे.
पंढरपूर (प्रतिनिधी) मंगळवेढा येथे विधानसभा निवडणुकीचे महविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची भव्य प्रचारसभा
आठवडा बाजार येथे रविवार दिनांक १७रोजी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ. सुप्रियाताई सुळे यांची जंगी जाहीर सभेत सडेतोड भाष्य केले.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत सुप्रियाताई यांनी राज्यातील महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, हवालदिल झालेला शेतकरी या सर्वच मुद्यांवर महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या हि संतांची संस्कारांची भूमी आहे, ईथे कुणावरही अन्याय होणार नाही, अनिल सावंत हा नवीन चेहरा आहे, त्यांचा कारभार पारदर्शक आहे, ते माळकरी असून आचरण शुद्ध आहे, आपले सरकार स्वाभिमानी, गरीब लोकांचं सरकार आहे, हे सरकार साखर कारखाना बंद पडू देणार नाही. दूध आणि शेतमालाला चांगला भाव दिला जाईल, या राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार यांनी व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिली.
या सगळ्यांना न्याय देऊन राज्य पुन्हा प्रगतीपथावर आणण्याच्या या लढाईमध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करत येणाऱ्या २० तारखेला तुतारी वाजवणार माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे , माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख , इतिहासकार श्रीमंत कोकाटे , संतोष नेहतराव, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत , चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे, सुभाष भोसले, संदीप मांडवे, दामोदर देशमुख, राहुलशेठ शाह, दत्ता भोसले, सुधीर भोसले, सुधीर अभंगराव आप्पासाहेब माने, चंद्रशेखर कोंडूभैरी , दादा पवार, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment