तामिळनाडू येथील आमदारांनी घेतले श्री विठुरायाचे दर्शन.
तामिळनाडू येथील आमदारांनी घेतले विठुरायाचे दर्शन.
पंढरपूर (प्रतिनिधी)_ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा तथा तामिळनाडू राज्यातील कोइंम्बतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ.वनाथी ताई श्रीनिवासन यांनी शुक्रवार दी १५नोव्हेंबर रोजी पंढरपूर मध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले.
त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा शहराध्यक्ष
डॉ.ज्योती शेटे यांच्या घरी अतिशय उत्कृष्ट अशा नाश्त्याचा आस्वाद घेतला.
त्याचबरोबर पंढरपुरातील अत्यंत प्राचीन असे ताकपिठे विठोबाचे दर्शन घेतले व पुढच्या दौऱ्यामध्ये पांडुरंगाला तुळशी अर्चन करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यानंतर विद्यमान आमदार व भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मोर्चा सौ.वनाथी ताई श्रीनिवासन यांनी यांनी प्रभाग क्र.१० मधील बूथ क्र.६२ या ठिकाणी जाऊन भाजी विक्रेत्या महिला त्याचबरोबर कामगार महिला यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र भाई मोदी यांनी,
महिलां साठीच्या योजना चालू केल्या ज्याच्या माध्यमातून महिलांचे सशक्तिकरण झालेलं आहे आणि भविष्यकाळ हा महिलांच्यासाठी अतिशय उत्तम असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन पश्चिम महाराष्ट्र कॉर्डिनेटर तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्य सचिव सौ.रंजिता ताई चाकोते,
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.शशिकांत नाना चव्हाण,
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता गोपाळ बेणारे,
भाजप महिला मोर्चा पंढरपूर शहर अध्यक्ष डॉ.सौ.ज्योती शेटे,
सौ सुप्रिया काकडे, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख,
सौ.अंजना ताई जाधव चिटणीस सोलापूर जिल्हा भाजप महिला मोर्चा,
सौ.सुवर्णा ताई कुरणावळ,
उपाध्यक्ष पंढरपूर शहर भाजप महिला मोर्चा,
सौ.शिल्पा म्हमाने, उपाध्यक्ष,पंढरपूर शहर भाजप महिला मोर्चा,
सौ.भाग्यश्री काकडे
उपाध्यक्ष,भाजप महिला मोर्चा पंढरपूर शहर तसेच
भाजप महिला मोर्चा च्या सर्व महिलांनी या कार्यक्रमाला यशस्वीपणे पूर्ण केले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा आमदार.सौ.वनाथी ताई श्रीनिवासन यांनी या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत सर्वचा सर्व ठिकाणी कमळच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment