आमदार झाल्यावर गोरगरीब जनतेच्या सर्व समस्या सोडविणार._भगीरथ भालके
मी आमदार झाल्यावर गोरगरीब जनतेच्या सर्व समस्या सोडविणार.
_भगीरथ भालके.
प्रतिनिधी पंढरपूर _
पंढरपूर येथील
गोरगरिबांच्या वसाहतीत अनेक समस्या असून या लोकांना जगणे अशक्य होत आहे, घरकुल तसेच गटारीच्या समस्या मी आमदार झाल्यावर सोडवितो, तुम्ही केवळ मतदानरुपी आशीर्वाद मला द्या असे आवाहन काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भगिरथ भालके यांनी केले. गुरुवार दिनांक १४रोजी ज्ञानेश्वर नगर येथे काँगेस पक्षाचा वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर
माजी नगरसेवक संजय बंदपट्टे, किरण घाडगे, ॲड राजेश भादुले, युवा नेते श्रीनिवास उपळकर , माजी उप नगराध्यक्ष सुधीर धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भालके म्हणाले, या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदा तरी विद्यमान आमदार आले का?तुम्ही भारतनानांचा काळ आठवा गुडघाभर पाण्यात ते लोकांची विचारपूस करायला येत,
मागील पोटनिवडणूकीत चुकीचा निर्णय झाला.
आता तसे झाले तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही,
आषाढी वारी काळात अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना प्रशासनाने जाणून बुजून त्रास दिला,त्यावेळी मी धावून आलो, मग करवाई थांबविली.
निवडणुका जवळ आल्याने
लाडकी बहीण योजना या सरकारने आणली. वाढत्या महागाईने कुटुंब उध्वस्त होत आहे.गोडेतेल, डाळी, साखर, गॅस सर्व महाग केले आहे. आता काँगेस महिलांना तीन हजार तर युवकांना चारहजार , शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपये कर्जमाफी,
मुलींना मोफत एस टी प्रवास , शासनाचे विमा कवच अशा लोककल्याणकारी योजना येणार आहेत.
यावेळी संजय बंदपट्टे, किरण घाडगे, श्रीनिवास उपळकर , ॲड राजेश भादुले यांनी मनोगत व्यक्त करून भालके यांना विजयी करण्यासाठीं आवाहन केले.

Comments
Post a Comment