Posts

Showing posts from November, 2025

नगरपालिका निवडणुक प्रशासन सज्ज.

Image
 पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : मतदानासाठी प्रशासन सज्ज        *नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका * ईव्हीएम मतदान यंत्र सील ;अतिरिक्त ३६  राखीव मशीन  पंढरपूर दि:-(29)- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला मतदान व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण 18 प्रभागात 95 हजार 559 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी  ईव्हीएम मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडली  असून, प्रशासनाने शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती  सर्व यंत्रणा सज्ज केल्या असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. पंढरपूर नगरपालिका निवडणूकसाठी  एकूण ९७ मतदान केंद्रासाठी यंत्रे सज्ज करण्यात आले असून, प्रभाग क्रमांक ०१, ०२, ०३, ०६, ०७.०८, १०, ११ ,१२,१५, १६, १७,१८   या प्रभागासाठी दोन  मशीन असतील तर प्रभाग क्रमांक ०४,०५,०९,१३,१४ या प्रभागात उमेदवारांची संख्या कमी असल्याने एकच मशीन राहणार आहे.  तसेच प्रत्य...

विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहेत पण अफवांना बळी पडू नका,_माजी आमदार प्रशांत परिचारक.

Image
 विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहेत पण अफवांना बळी पडू नका, सर्वांगीण विकासासाठी हक्काचा माणूस हवा. माजी आमदार प्रशांत परिचारक. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आता शेवटच्या दोन दिवसात अनेक फेरी झाडण्यात येणार आहेत मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कालिकादेवी चौक येथे झालेल्या कॉर्नर प्रचारसभेत जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व जनतेसाठी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही देऊन या परिसरातील मुस्लिम व ईतर समाजातील लोकांची मने जिंकली. या प्रचारसभेत व्यासपीठावर इक्बाल बागवान, सुजीत सर्वगौड, भाजप उमेदवार रेहाना बोहरी, इब्राहिम बोहरी, इस्माईल बोहरी, उमेदवार गुरु दोडिया तसेच या भागातील स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले मोठे मालक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी कधीही जात, धर्म, पंथ हे पाहून राजकारण केले नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. आज केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. पंढरपूर साठी त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आहे, मग सरकार ज्या पक्ष...

केवळ स्वार्थ साधण्यासाठी विरोधक हे नगरपालिका निवडणूक लढवत आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक.,

Image
 केवळ स्वार्थ साधण्यासाठी विरोधक नगरपालिका निवडणुकीत आहेत, नगराध्यक्ष पद आरक्षित झाले असते तर फिरकले पण नसते._माजी आमदार प्रशांत परिचारक. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक येथे भाजप आणि शहर विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दी २८नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली. या प्रचारसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांच्या स्वार्थी तसेच जातीय राजकारणावर कठोर शब्दात टीका केली यावेळी व्यासपीठावर प्रभाग क्रमांक १७मधील उमेदवार शंकर सूरवसे, गुरु दोडिया, संजय निंबाळकर, सुजित सर्वगौड आदी मान्यवर उपस्थित होते. परिचारक म्हणाले परवा नगरपालिकेत गोंधळ घातला, प्राथमिक गोष्टी माहित नसल्याने गोची झाली आणि दोष इतरांना देण्यात येत होता, येथील नगराध्यक्ष पद ओ बी सी किंवा एस सी साठी आरक्षित झाले असते तर हे विरोधक पंढरपूर कडे फिरकले पण नसते, केवळ सर्वसामान्य महिला साठी पद गेल्याने स्वार्थ साधण्यासाठी न पा निवडणूक लढवत आहेत. एकदा निवडणूक झाली की पुन्हा नॉट रिचेबल, मिस्टर इंडिया होणार, आम्ही काय पैशासाठी राजकारण करत नाही, राजकारण ह...

पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची लढाई,_भालके.

Image
 पंढरपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमची लढाई, भगीरथ भालके. प्रतिनिधी  पंढरपूर :  देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. पंढरपूर नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यास भरघोस निधी मिळवता येणार आहे. पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करता येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून अपवाद वगळता यांची सत्ता आहे. यांना अद्याप पंढरपूर धूळमुक्त करता आले नाही. पंतप्रधान आवास योजनेची घरे नागरिकांना दिली जात नाहीत. गुंडगिरी, हुकूमशाहीमुळे नागरिक भयभित आहेत. नागरिकांनी यांना झिडकारले आहे. आता याच नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. विठ्ठल परिवार एकसंघपणे लढत आहे. येत्या निवडणूक निकालानंतर हे दिसून येईल. त्यामुळे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमची लढाई असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले. ते झेंडे गल्ली येथे प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी  भगीरथ भालके, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके , प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सौ राजश्री गंगेकर, युवा उमेदवार अक्षय गंगेकर, नागेश गंगेकर,शालिवाहन कोळेकर, मोहम्म...

स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अनुदीप फाउंडेशन यांच्या समन्वयातून मेगापूल कॅम्पस ड्राइव्ह चे उद्घाटन.

Image
  स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि अनुदीप फाउंडेशन यांच्या समन्वयातून स्वेरीत मेगापूल कॅम्पस ड्राईव्हचे उद्घाटन सुमारे २५ कंपन्या आणि १५०० पेक्षा जास्त पदवीधरांचा सहभाग पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) आणि  'अनुदीप फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये आज दि.२८ नोव्हेंबर आणि उद्या दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी 'मेगापोल कॅम्पस ड्राईव्ह'चे आयोजन करण्यात आले आहे. आज रोजी पंढरपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रशांत डगळे, अनुदीप फौंडेशनचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र मौर्य तसेच पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या सायन्स अँड टेक्नोलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार या मान्यवरांच्या शुभहस्ते व विविध कंपन्यांच्या मानव संसाधन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.             या उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला अनुदीप फौंडेशनच्या मा.वाहबीझ यांनी अनुदीप फौंडेशनच्य...

मुजीब तांबोळी यांच्या प्रचाफेरीस उस्फुर्त प्रतिसाद तांबोळी यांचे समाजकार्य हीच यशाची ग्वाही.,

Image
 मुजीब तांबोळी यांच्या प्रचारफेरीस उस्फुर्त प्रतिसाद, तांबोळी यांचे समाजकार्य हीच यशाची ग्वाही. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथे नगरपालिका निवडणुकीत प्रचारात रंगत येत असून प्रभाग क्रमांक १८ अ मधून  अपक्ष उमेदवार असून जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन आपली विकासाची भूमिका मांडत आहेत. मुजीब तांबोळी हे दिलखुलास आणि दिलदार वृत्तीचे बहारदार व्यक्तिमत्व असल्याने जनमानसात त्यांना आदराचे व मानाचे स्थान आहे. तांबोळी कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवेत अग्रेसर असून प्रभागातील विविध समस्या त्यांनी एका चुटकी सरशी सोडविल्या आहेत.  सर्वच पक्षांनी मुस्लिम समाजावर अन्याय केला असून कोणत्याही पक्षाने नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले नाही, हा या अल्पसंख्य समाजावर अन्याय असून समाजाची परखड भूमिका मांडण्यासाठी तरुण तडफदार उमेदवार मुजीब तांबोळी यांना विजयी करणे गरजेचे आहे. प्रभागात विकासाची गंगा वाहत असून हजारो रहिवासी त्यांच्या विकासकांवर समाधानी आहेत. मुजीब तांबोळी यांचे मोठे बंधू मुनीर तांबोळी हे देखील या भागात अनेक वर्षे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. नगरपालिकेत त्यांच्या शब्द...

निवडणुकीच्या आधीच गोरगरीब जनतेच्या सोयीसुविधेसाठी लढा देणारे अक्षय गंगेकर.

Image
 निवडणुकीच्या आधीच लोकांच्या सोयीसुविधे साठी लढा देणारे अक्षय गंगेकर. पंढरपूर ( प्रतिनिधी) नागरिकांच्या अविरत सेवेसाठी सातत्याने धडपडणाऱ्या अक्षय गंगेकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी उत्तम रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड चिखल होऊन लोकांना चालता येत नव्हते, या रस्त्यावर केवळ मुरुम टाकून मलमपट्टी केली जात होती, मात्र या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी चे उमेदवार अक्षय गंगेकर यांनी जेसीबी आणून चांगल्या प्रतीचा रस्ता करण्याचे कार्य सुरू केले, मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी पोलिसांना मध्ये घालून विकासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तरीही अक्षय गंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम राहून रस्ता चांगला करणार आहेत. संपादक. चैतन्य उत्पात.

पंढरपूर येथे जनतेचा परिचारक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावरच विश्वास.

Image
 पंढरपुरात परिचारक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावरच नागरिकांचा विश्वास  भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे मैदानात पंढरपूर /प्रतिनिधी  पंढरपूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात थेट लढत होत आहे.  गेली अनेक वर्षांपासून पालिकेवर वर्चस्व असणाऱ्या पांडुरंग परिवाराने भाजपा उमेदवार शामल शिरसट यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक  हे निवडणूक मैदानात उतरली असून त्यांच्या प्रचार केलेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.   २०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शहर विकास आघाडीने शहरातील नागरिकांना दिलेला वचननामा पूर्ण केल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे.  मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरात भाजपा सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांवर आणि पुढील ...

गोरगरीब जनतेचे कैवारी गंगेकर कुटुंब जनतेच्या भेटीला लोकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने भारावले गंगेकर कुटुंबीय.,

Image
 गोरगरिबांचे कैवारी अक्षय गंगेकर आणि मातोश्री सौ राजश्री गंगेकर हे जनतेच्या भेटीला, लोकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने भारावले गंगेकर कुटुंबीय. पंढरपूर ( प्रतिनिधी) गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचे कैवारी अशी ओळख असलेले नगरपालिका निवडणुकीत प्रथम पासूनच प्रचारात आघाडी घेतलेले अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी प्रचारफेरी काढून प्रभागातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन भेट घेतली. त्यांचे आगमन होताच सर्व नागरिकांनी उस्फुर्त व मनापासून स्वागत केले. अक्षय गंगेकर हे असे धाडसी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की दिल्या शब्दाला नेहमीच जागतात असा आजवरचा अनुभव लोकात आहे, कोणतेही, कसलेही काम असू द्या, एकदा गंगेकर कुटुंबीयांनी शब्द दिला म्हणजे ते होणारच, याच दिलदार वृत्तीने अनेक वर्षांपासून त्यांच्या घरातील लोक जनतेचे नेतृत्व करीत आहेत. शेकडो घरात माता, भगिनी यांचे आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कीतीही मोठे आमिष विरोधकांनी दाखविले तरीही लोक त्यांच्यापासून कधीही दूर गेले नाहीत, संकटात सर्वात आधी धावून येणारे हे कुटुंब  कोणताही विचार न करता जनतेच्या मदतीला धावून जा...

नगरपालिका निवडणुकीत प्रचारात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या गंगेकर कुटुंबीयांची प्रचारात जोरदार मुसंडी.

Image
 पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन येथे डॉ प्रणिता भालके यांच्या उस्फुर्त रॅलीने गंगेकर कुटुंबाचा विजय निश्चित. पंढरपूर (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रणिती भालके यांच्या आगमनाने मतदारात नव उत्साह निर्माण झाला, सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचारात भालके गट आघाडीवर असून सायंकाळी प्रभाग क्रमांक ३ अ आणि ३ब येथे ढोल ताशाच्या गजरात हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांच्या उस्फुर्त आणि आनंददायी  स्वागताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके या भारावून गेल्या, त्या म्हणाल्या जनतेचा एवढा अप्रतिम प्रतिसाद पाहून या निवडणुकीत आपला विजय हा आता निश्चित झाला आहे. या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी चे उमेदवार अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी यावेळी प्रभागातील लोकांशी विविध विषयावर चर्चा करून विकासकामे करू असे आश्वासन दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून गंगेकर कुटुंब हे पंढरपूर नगरपालिकेत गोरगरीब जनतेच्या सेवेला धावून येत असल्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंग...

पंढरपूर शहरात न पा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू, भाजप उमेदवाराची आघाडी.

Image
 पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक हा एकच विषय संपूर्ण शहरात चर्चेचा एक विषय झाला असून चौकाचौकात हाच विषय सुरू आहे. भाजप उमेदवारांना वाढता प्रतिसाद. पंढरपूर (प्रतिनिधी) भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात ही लढत होत असून डॉ प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहेत त्यांच्याविरुद्ध भाजप च्या सक्षम प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सौ श्यामल शिरसट, पापरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पती लक्ष्मण शिरसट हे माजी नगराध्यक्ष होते तसेच अनेक वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली आहे. मात्र तरीही विरोधक असणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी, तसेच दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भगीरथ भालके यांनी विखारी टीका परिचारक कुटुंबीय व भाजप नेते यांच्यावर सुरू केली आहे. चाळीस वर्षात शहरात कोणती विकासकामे केली? असा सवाल करीत आहेत, मात्र सुजाण नागरीक हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून सत्ता देत आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज जे नागेश भोसले विरोधकांसोबत फिरून विकासकामांवर टीका करत आहेत तेच साडे स...

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न.

Image
 *पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न*     पंढरपूर (दि-२२):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला निवडणूक व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने शनिवार (दि.२२)  नामसंकीर्तन  सभागृहात   निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर  प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एल सीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवुन आणि ईव्हीएम मशीन हाताळणी चे प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत अचुकपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. तसेच ईव्हिएम सीलींग व हाताळणी मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पध्दत आणि त्यावेळेस घ्यावयाची दक्षता य...

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न.

Image
 *पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न*     पंढरपूर (दि-२२):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला निवडणूक व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने शनिवार (दि.२२)  नामसंकीर्तन  सभागृहात   निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर  प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एल सीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवुन आणि ईव्हीएम मशीन हाताळणी चे प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत अचुकपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. तसेच ईव्हिएम सीलींग व हाताळणी मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पध्दत आणि त्यावेळेस घ्यावयाची दक्षता य...

माढ्यात रंगणार कृषी व सांस्कृतिक महोत्सव,

Image
 *माढ्यात भरणार कृषी व सांस्कृतिक महोत्सव* *आमदार अभिजीत पाटील यांनी जपली परंपरा* (महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेता अभिनेत्री तसेच कॉमेडी व महाराष्ट्रातील कर्तबगार कलाकारांनी गजबजणार माढा शहरात) प्रतिनिधी/-  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील साहेब यांचे संकल्पनेतून गुरूवार दि.२०,२१, २२ ते रविवार दि.२३ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सहकार महर्षि गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कुल, वैराग रोड, माढा येथे *माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२५* हा भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आमदार अभिजीत पाटील यांनी कार्यक्रमाची पाहणी करून स्टेज पूजन करण्यात आले यावेळी माढा शहरातील अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान, शेतकरी प्रबोधन, स्थानिक कला सांस्कृतीचा जागर, मनोरंजन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करणेत आलेला आहे. या महोत्सवामध्ये अत्याधुनिक कृषी यंत्रसामुग्री, बी-बियाणे, खते, शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, जल व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग आदींची ...

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या दिवशी १७अर्ज माघारी.

Image
 पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी 17 अर्ज माघारी पंढरपूर :  दि.20- पंढरपूर नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या  दुसऱ्या दिवशी 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेआहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली. पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते. यात नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 323 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दि.21 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. 19 रोजी एकह अर्ज माघारी घेण्यात आला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.20 रोजी 17 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. शुक्रवार दि.21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार देण्याचा शेवटचा दिवस आहे.  *यांनी घेतले अर्ज माघारी* प्रभाग क्र.2 ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर अपक्ष, अश्विनी श्रीनिवास बोरगावकर अपक्ष, प्रभाग क्र.9 ब मधून रा...

पंढरपूर न पा निवडणुकीत ३६६पैकी ३२१अर्ज मंजूर,नगराध्यक्ष पदाचे आठही अर्ज मंजूर.

Image
 पंढरपूर नगरपरिषद निवडणुक; नगराध्यक्षपदाचे 08 तर नगरसेकपदाचे 321 अर्ज मंजूर               - निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर  पंढरपूर :  पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.. त्याची मंगळवार दि. 18 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी 08 तर नगरसेवक पदासाठी 366 दाखल उमेदवारी अर्जापैकी 321 मंजूर तर 39 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.तसेच 6 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या या अर्जाची छाननी मंगळवार दि. 18 रोजी नगरपरिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी...

ट्रम्प टेरीपुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कोणताही धोका नाही भारताचे भवितव्य उज्वल डॉ. शैलेश देवळणकर.

Image
 भारताचा विकास अटळ असून ट्रम्प टेरीफमुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात नाही. डॉ.शैलेश देवळणकर. पंढरपूर (प्रतिनिधी) भारताचा विकास हा न टाळता येण्याजोगा विषय आहे येत्या काही दिवसांत भारत जगातील तिसरी  अर्थव्यवस्था आर्थिक महासत्ता असलेला देश असेल,  ट्रम्प टेरीफ मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कोणताही धोका नाही.आपल्या देशाचे भवितव्य अतिशय उज्वल आहे असे प्रतिपादन  आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळणकर यांनी केले. ते पंढरपूर अर्बन बँक आयोजित देशभक्त बाबुराव जोशी बौद्धिक व्याख्यानमालेत पहिले पुष्प ट्रम्प टेरिफ आणि भारत, या विषयावर बोलत असताना केले,  यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रशांत परिचारक, बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्षा सौ माधुरी जोशी, हरीश ताठे  आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ शैलेंद्र देवळणकर म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०वर्षात ८२देशांना भेटी दिल्या म्हणून टीका केली जाते. पण देशाचे आर्थिक हितसंबंध, व्यापार वाढवायचा असेल तर यापेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या पाहिजेत, जागतिक पातळीवर प्रभाव वाढविण्यासाठी विदेश दौरे आ...

डॉ संतोष डोंगरे यांनी सौर ऊर्जा क्षारीकरण विषयात केली पी एचडी.

Image
 डॉ. संतोष द. डोंगरे यांनी सौर जल-क्षारीकरण प्रणालीवर पीएच.डी. पूर्ण केली पंढरपूर (प्रतिनिधी): स्थानिक संशोधक डॉ. संतोष द. डोंगरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात सौर जल-क्षारीकरण प्रणाली (Solar Desalination System) या संशोधन विषयावर आपला पीएच.डी. संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या संशोधन चे सादरीकरण ८ ऑगस्ट २०२५ रोजी ओरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदौर येथे करण्यात आले. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवनियुक्त कुलगुरू प्रा. (डॉ.) अमोल गोरे यांचे हस्ते डिग्री प्रदान झाली या संशोधनासाठी त्यांनी प्रा. (डॉ.) एस. के. सोमाणी, माजी कुलगुरू, ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदौर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह-मार्गदर्शक प्रा. (डॉ.) एच. एस. पाटील, प्राचार्य, GIDC कॉलेज, नवसारी (गुजरात) यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. डॉ. संतोष द. डोंगरे यांचे संशोधन हे पिण्यायोग्य पाण्याच्या टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणारे असून, सौर ऊर्जेचा वापर करून समुद्रातील अथवा खाऱ्या पाण्यापासून स्वच्छ व शुद्ध पाणी मिळविण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या अभिनव संशोधनात सौर परबोलिक डिश (Solar Parabolic Di...

कार्तिकी वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस ५कोटी १८लाख रुपये उत्पन्न मिळाले.

Image
 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास कार्तिकी यात्रेत 5 कोटी 18 लाखाचे उत्पन्न, पंढरपूर दि.10:- कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 5 कोटी 18 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे  लेखाधिकारी मुकेश अनेचा  यांनी दिली. कार्तिकी शुध्द 01 (दिनांक 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दिनांक 05 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 4808289 रुपये अर्पण, 12719520 रुपये देणगी, 5416500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 7159910 रुपये भक्तनिवास, 17715227 रुपये हुंडीपेटी, 50000 रूपये पुजा तसेच 3336876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 670906 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.  मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 4141314 रुपये अर्पण, 11699473 रुपये देणगी, 6064620 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4448581 रुपये भ...

जुगार अड्ड्यावर कारवाई, एक कोटी १९लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Image
 उप विभागीय पोलीस , कार्यालय, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण  पंढरपूर यांची पुन्हा सांगोला भागातील जुगार अड्ड्‌यावर मोठी कारवाई. १ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रू.चा मुद्देमाल जप्त"  पंढरपूर(प्रतिनिधी )_ऐन नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पंढरपूर उप विभागीय पोलीस कार्यालयाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून १कोटी १९लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसअधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी  मौजे कोळा ता. सांगोला जि.सोलापूर येथे अंकुश आनंदा अलदर  त्याच्या कोळा शिवारातील  मधील शेडनेट मध्ये लोकांना जमवून विनापरवाना जुगार अड्डा चालवित असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकला .  रविवार दि. ०९नोव्हेंबर रोजी   मौजे कोळा ता.सांगोला जि.सोलापूर येथे दुर्गम डोंगराळ भागामध्ये जावून अंकुश अलदर याच्या जुगार अड्यावर छापा कारवाई केली आहे.  कोळा येथील शेडनेटच्या मध्ये लाकडी ६ टेबलवर गोलाकार करून जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, जुगार खेळण्...

आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद._प्रवीण दरेकर.

Image
 *आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद* - आमदार प्रविण दरेकर *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या ५ साखर पोत्यांचे आमदार प्रविण दरेकरांच्या हस्ते पूजन* प्रतिनिधी/- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ सुरू असलेल्या गळीत हंगामातील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सायली प्रविण दरेकर, डॉ. यश प्रविण दरेकर त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संचालक मंडळ, कारखान्याचे सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे वैभव आहे. मध्यंतरीच्या काळी कारखान्याला घरघर लागली होती. आ. अभिजीत पाटील यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या रक्षणासाठी उडी घेतली. त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला व कारखान्याचे नेतृत्व त्यांच्य...

गोपाळपूर काल्याने कार्तिकी वारीची सांगता.

Image
 गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता पंढरपूर(प्रतिनिधी)_कार्तिकी वारीची सांगता आज बुधवार,दि.५ नोव्हेंबर - गोपाळकाला होऊन झाली. गोड झाला, गोपाळांनी गोड केला च्या जयघोषात अवघी श्री कृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी हजारो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमन गेली. कार्तिकी यात्रेचा सोहळ्यांची परंपरे प्रमाणे काल्याच्या उत्सवाने बुधवारी (ता.५) सांगता करण्यात आली. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना जास्तीत जास्त सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती. दरम्यान या काल्याच्या उत्सवा बरोबरच खऱ्या अर्थाने चार्तुमासाची देखील समाप्ती होत असल्याने गेल्या चार महिन्यापासून खास चार्तुमासासाठी येथे मुक्कामास असलेल्या वारकऱ्यांना देखील आपआपल्या गावाकडे परत जाण्याचे आता वेध लागले आहेत. कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते पौर्णिमेच्या दिवशी पंरपरे नुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे होणाऱ्या गोपाळकाल्याचे. त्यानुसार बुधवारी (ता.५) पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पासूनच विविध संतांच्या दिंड्या चंद्रभागा नदीचे स्नान करुन गोपाळपूरकडे काल्यासाठी रवाना...

रम्यस्थळ चंद्रभागा.

Image
 *रम्य स्थळ चंद्रभागा* कार्तिकातील शांत सुंदर पौर्णिमेची संध्याकाळ. समोर चंद्रभागेचा नितळ काठ!! भाविकांची लगबग.. मऊशार वाळू तुडवत, सुखावणारा वारा अंगावर घेत, हातातील पूजेचे तबक सावरीत आई, काकू समवेत आलेली मी. बरोबर हात धरून आमच्या सोबत इकडे तिकडे बघत चालणारी माझी छोटी बहीण, क्षितिजावर उगवणारा फिकट दिसणारा मोतिया रंगाचा चंद्र आणि हेलकावणारे दिवे आपल्या अंगावर घेऊन संथ वाहणारी चंद्रभागा!!  हे आठवणींच्या सोनेरी पोतडीत साठवलेले दृश्य त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मला हमखास आठवतेच!!    कार्तिकी वारीचा हा शेवटचा दिवस. वारीला आलेली गर्दी ओसरलेली असे.  काही नेमाचे वारकरी आणि स्थानिक मंडळी चंद्रभागेच्या पात्रात  दिवे सोडण्यासाठी आलेले असत.  आमच्या घरी तर दुपारी चार वाजल्यापासून माईची गडबड सुरू होई! ती तुपात भिजवलेल्या १०८ त्रिपुरी वाती, द्रोण, नैवेद्य, हळदी कुंकू, फुलं, उदबत्ती, चंद्रभागेची ओटी असे सारे जिन्नस तबकातून, पिशवीतून भरून ठेवे. कधी कधी ही त्रिपुरी पौर्णिमेची पूजा आमच्या घरी उतरणारे कोमटी समाजातील वारकरी आमच्या कडून करून घेत. हलक्या गुलाबी थंडीचा अंमल भ...

कर्मयोगीच्या आविष्कार , मध्ये समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण.

Image
 कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण. “आविष्कार” सारख्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना : डॉ. एस पी पाटील.   , पंढरपूर(प्रतिनिधी )_ विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले. शनिवार दि ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी  तर्फे आयोजित केलेल्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे महाविद्यालय स्तरावरील आविष्कार या प्रकल्प स्पर्धेच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामध्ये एकूण स्पर्धकांपैकी बारा स्पर्धकांची  विद्यापीठाच्या विभाग स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती आविष्कार चे महाविद्यालयाचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी दिली.  या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी ह्युम्यानिटी लॅंगवे...

पावे जिवलगा.

Image
 *पावे जिवलगा*  एक ताजी वाऱ्याची झुळूक  चंद्रभागेच्या नितळ पवित्र पाण्यावरून, काठावरच्या रेशमी मऊशार वाळू वरून, समोरच्या पुंडलिकाच्या शिखराला वळसा घालून हळूहळू पुढे सरकायला लागायची. वाटेत तिला नित्यनेमाने चंद्रभागेच्या स्नानाला येणारे गावकरी, वामांगी रखुमाई घेऊन अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माला भेटायला आलेले वारकरी, कुठलाही विकार डोळ्यात, मनात न आणता स्नान करणारे स्त्री, पुरुष,लहान मुलं, काठावर उभ्या असलेल्या डौलदार नावा, त्यांना सावरणारे नावाडी, पुंडलिकासमोरच्या चौफाळ्यावर धार्मिक विधी करणारे यजमान  असे सारे भेटायचे..या साऱ्या गोतावळ्याला स्पर्श करत समोर पसरलेल्या वाळवंटातून महाद्वार घाटाच्या प्रशस्त दगडी पायऱ्यांवरून अलवारपणे ती वर यायची. घाटाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या  दोन भव्य शिंदे सरकार आणि होळकर वाड्यावरुन ती महाद्वार वेशीकडे यायची. वाटेतल्या सनातन पिंपळपानांशी हळुवारपणे हितगुज करून, पारावर बसलेल्या माणसांची वास्तपुस्त करून भव्य महाद्वार वेशीवर ती थबकत असे. तिच्यात डेक्कन अगरबत्तीचा, अकरा रूद्र मारूतीला वाहिलेल्या रूई कण्हेरीच्या फुलांचा,...