जुगार अड्ड्यावर कारवाई, एक कोटी १९लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
उप विभागीय पोलीस , कार्यालय, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण पंढरपूर यांची पुन्हा सांगोला भागातील जुगार अड्ड्यावर
मोठी कारवाई.
१ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रू.चा मुद्देमाल जप्त"
पंढरपूर(प्रतिनिधी )_ऐन नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पंढरपूर उप विभागीय पोलीस कार्यालयाने व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगोला तालुक्यातील कोळा या गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून १कोटी १९लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसअधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी मौजे कोळा ता. सांगोला जि.सोलापूर येथे अंकुश आनंदा अलदर त्याच्या कोळा शिवारातील मधील शेडनेट मध्ये लोकांना जमवून विनापरवाना जुगार अड्डा चालवित असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकला . रविवार दि. ०९नोव्हेंबर रोजी मौजे कोळा ता.सांगोला जि.सोलापूर येथे दुर्गम डोंगराळ भागामध्ये जावून अंकुश अलदर याच्या जुगार अड्यावर छापा कारवाई केली आहे.
कोळा येथील शेडनेटच्या मध्ये लाकडी ६ टेबलवर गोलाकार करून जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरीता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड/शेडनेट मध्ये असलेले खुर्चा, टेबल, फिज, गॅस सिलेंडर व शेगडी इत्यादी साहीत्य जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये १) रोख रक्कम ४,१७,५७७/- २) टेबल, खुर्चा, जुगार खेळण्याचे साहित्य, फ्रीज, पत्यांचे डाव असलेले बॉक्स्, इ. साहित्य व मोबाईल फोन किंमत रुपये -९,३८,२०० /- रुपये ३) ११ चारचाकी वाहने किंमत रुपये ९६,००,०००/- ४) १४ दुचाकी वाहने किंमत रुपये - ९,६०,०००/- असा एकुण १,१९,१५,७७७ रुपये (अक्षरी एक कोटी एकोणीस लाख पंधरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये) चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस ४५ जुगार खेळणा-या इसमां विरुध्द् महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ३(१) ४ व ५ प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर ८८२/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ,.अपर पोलीस अधिक्षक , प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, अब्दुलहमीद शेख, नितीन जगताप, महादेव पिसाळ, ढवळे, निलेश रोंगे, कामतकर, कांबळे,विनोद शिंदे माने, देशमुख,साळुंखे, शिंदे, गरड, शेख, आटपाडकर, जाधव, घोडके, पाटील, देवकते, भोसले काकडे, नरळे , सागर गवळी, चौगुले, टिंगरे, वैभव घायाळ , सुर्यवंशी व चालक गोडसे यांनी पार पाडलेली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment