विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहेत पण अफवांना बळी पडू नका,_माजी आमदार प्रशांत परिचारक.


 विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहेत पण अफवांना बळी पडू नका,

सर्वांगीण विकासासाठी हक्काचा माणूस हवा.

माजी आमदार प्रशांत परिचारक.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आता शेवटच्या दोन दिवसात अनेक फेरी झाडण्यात येणार आहेत मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कालिकादेवी चौक येथे झालेल्या कॉर्नर प्रचारसभेत

जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व जनतेसाठी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही देऊन या परिसरातील मुस्लिम व ईतर समाजातील लोकांची मने जिंकली.

या प्रचारसभेत व्यासपीठावर इक्बाल बागवान, सुजीत सर्वगौड, भाजप उमेदवार रेहाना बोहरी, इब्राहिम बोहरी, इस्माईल बोहरी, उमेदवार गुरु दोडिया तसेच या भागातील स्थानिक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले मोठे मालक स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी कधीही जात, धर्म, पंथ हे पाहून राजकारण केले नाही.

वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना नगराध्यक्ष म्हणून संधी दिली.

आज केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे.

पंढरपूर साठी त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आहे, मग सरकार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाचा कारभारी निवडला पाहिजे, याचा फायदा सगळ्यांना होणार असून रोजगार मिळणार आहे.

सर्वात जास्त गरीबी ही आज मुस्लिम समाजात आहे, माझे काही बिघडत नाही, मी आमदार, खासदार नाही, पण तरीही माझ्या नावाचा वापर करून राजकारण सुरू आहे, मला संपवण्यासाठी सर्व चालू आहे पण आम्ही संपणार नाही.

सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पुर्वी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक आणि भागवताचार्य वा ना उत्पात यांनी फरशी गल्ली या मंदिर परिसरात इब्राहिम बोहरी यांना निवडून आणले होते,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना गोरगरीब जनतेसाठी आणल्या लाडकी बहीण योजना जात पाहून दिली नाही, १८कोटी शेतकऱ्यांना 

पेन्शन योजना सुरू केली आहे पी एम फंडातून कर्ज दिले जात आहे गरिबांसाठी पाच लाख रुपयांची आरोग्यविमा योजना सुरू केली आहे.

उद्या निवडणूक झाली की हे सरकोलीला निघून जातील.

यांचा डोळा नगरपालिकेत येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर आहे,

भविष्यात पंढरीत दरवर्षी पाच कोटी भाविक येणार असून अडीच हजार कोटी रुपये पंढरीच्या व्यापारी, दुकानदार,व्यावसायिकांना मिळणार आहेत.

गरिबी संपवायची असेल तर अर्थकारण मजबूत झाले पाहिजे, एवढा निधी उपलब्ध असताना फाटकी झोळी उपयोगाची नाही,

विकास आणि सकारात्मक बदल हवा असेल तर  अफवांना बळी पडू नका असे आवाहन माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी केले.

कालिकादेवी चौक येथील 

प्रचारसभेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.