पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची लढाई,_भालके.


 पंढरपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमची लढाई,

भगीरथ भालके.

प्रतिनिधी 

पंढरपूर : 

देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. पंढरपूर नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यास भरघोस निधी मिळवता येणार आहे. पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करता येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून अपवाद वगळता यांची सत्ता आहे. यांना अद्याप पंढरपूर धूळमुक्त करता आले नाही. पंतप्रधान आवास योजनेची घरे नागरिकांना दिली जात नाहीत. गुंडगिरी, हुकूमशाहीमुळे नागरिक भयभित आहेत. नागरिकांनी यांना झिडकारले आहे. आता याच नागरिकांनी निवडणूक हातात घेतली आहे. विठ्ठल परिवार एकसंघपणे लढत आहे. येत्या निवडणूक निकालानंतर हे दिसून येईल. त्यामुळे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आमची लढाई असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले. ते झेंडे गल्ली येथे प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी  भगीरथ भालके, नगराध्यक्ष पदाच्या

उमेदवार डॉ. प्रणिता भालके , प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सौ राजश्री गंगेकर, युवा उमेदवार अक्षय गंगेकर, नागेश गंगेकर,शालिवाहन कोळेकर, मोहम्मद उस्ताद आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भगीरथ भालके म्हणाले की, देशात आणि राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी यांना शहराच्या विकासासाठी निधी दिला जात नाही. देवाच्या नावाखाली निधी मिळवला जातो. विकास कामांच्या नावाखाली तेच ते ठेकेदार काम करतात. नगरपालिकेच्या शाळांची दुरवस्था आहे.

ही दुरवस्था ठेवल्यानेच स्वतःच्या खासगी शाळा दिमाखात सुरू आहेत. विकासाच्या नावाखाली डीपी प्लॅनमध्ये लोकांची घरे पाडली. स्वतःच्या घरे, बँकाच्या इमारती मात्र

वाचवल्या. स्वतःकडे सत्ता असताना शहरातील धूळ, पाणीपट्टी, नमामि चंद्रभागेच्या कामांचे काय झाले? कामात मोठा भ्रष्टाचार आहे. आषाढी ते कार्तिकी यात्रा तीन महिन्याच्या कालावधीत शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ५ कोटींचा निधी आला. मात्र, खड्डे जसेच्या तसेच असल्याने तो निधी गेला कुठे, हेच नागरिकांना सांगावे. १९८२ च्या मास्टर प्लॅनमध्ये घरे उद्ध्वस्त

झालेल्या नागरिकांना अद्याप मोबदला दिला गेला नाही आणि आता त्याच नागरिकांच्या पाया पडून मते मागत आहेत. विकासकामे केली असती तर अशी पाया पडण्याची वेळ आली नसती, असे म्हणत भगीरथ भालके म्हणाले की, आमची लढाई ही पंढरपूर पंढरपूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आहे. तसेच धूळमुक्तीसाठी असल्याचे सांगितले.

डॉ प्रणिता भालके म्हणाल्या, मी निवडून नगराध्यक्ष झाल्यावर पहिल्याप्रथम नगरपालिकेची बिल्डिंग दुरुस्त करणार आहे तसेच नगरपालिकेचे बंद पडलेल्या शाळा सुरू करणार आहे शहरातील अनेक हेरिटेज प्रॉपर्टी आहेत त्यांचे जतन करून नदीची दुरावस्था दूर करण्यात येणार आहे नदीवर चांगले घाट बांधून तिथे व्यवसाय करणाऱ्या महिलांना न्याय देण्यात येणार आहे चंद्रभागा न मामीच्या नावावर चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यात आली आहे या नदीमध्ये देवाचे फोटो, हार फुले तसबीरी पडल्या असून नदीची स्वच्छता करणे हे प्राध्यान्य राहील समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि भय मुक्त पंढरपूर हाच आमचा नारा असेल स्वर्गीय भारत नानांच्या विचारांचा वारसा पुढे आम्ही घेऊन जात आहोत पंढरपूर शहर धुळीत माखून गेले आहे पहिल्याप्रथम गावातील धूळ आम्ही नष्ट करणार आहोत .

तलवारीवर साचलेली धूळ दूर करून ही तलवार धारदार करा आणि आम्हा तिघांनाही या निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन डॉक्टर प्रणिता भालके यांनी आपल्या भाषणात केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.