कर्मयोगीच्या आविष्कार , मध्ये समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण.


 कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण.

“आविष्कार” सारख्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना : डॉ. एस पी पाटील. 

 , पंढरपूर(प्रतिनिधी )_

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले. शनिवार दि ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी  तर्फे आयोजित केलेल्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे महाविद्यालय स्तरावरील आविष्कार या प्रकल्प स्पर्धेच्या च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामध्ये एकूण स्पर्धकांपैकी बारा स्पर्धकांची  विद्यापीठाच्या विभाग स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती आविष्कार चे महाविद्यालयाचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी दिली. 

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी ह्युम्यानिटी लॅंगवेज फाईन आर्ट्स, कॉमर्से मॅनेजमेंट लॉं, इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी, प्युअर सायन्स, अॅग्रिकल्चर अॅनिमल हसबंड्रि आदि विभागामध्ये विविध प्रकल्प सादर केले. सदर स्पर्धेमध्ये प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. डॉ एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, डॉ एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर,  संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ तसेच विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले व सर्व प्राध्यापक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सह संयोजक प्रा.एस एम शिंदे, प्रा.दीप्ती कुलकर्णी, प्रा. अमरजीत देवकर, प्रा.के एस देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.