पंढरपूर शहरात न पा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू, भाजप उमेदवाराची आघाडी.


 पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक हा एकच विषय संपूर्ण शहरात चर्चेचा एक विषय झाला असून चौकाचौकात हाच विषय सुरू आहे.

भाजप उमेदवारांना वाढता प्रतिसाद.

पंढरपूर (प्रतिनिधी)

भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात ही लढत होत असून डॉ प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आहेत त्यांच्याविरुद्ध भाजप च्या सक्षम प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सौ श्यामल शिरसट, पापरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यांचे पती लक्ष्मण शिरसट हे माजी नगराध्यक्ष होते तसेच अनेक वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली आहे.

मात्र तरीही विरोधक असणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी, तसेच दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भगीरथ भालके यांनी विखारी टीका परिचारक कुटुंबीय व भाजप नेते यांच्यावर सुरू केली आहे.

चाळीस वर्षात शहरात कोणती विकासकामे केली? असा सवाल करीत आहेत, मात्र सुजाण नागरीक हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून सत्ता देत आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज जे नागेश भोसले विरोधकांसोबत फिरून विकासकामांवर टीका करत आहेत तेच साडे सात वर्षे नगराध्यक्ष होते, त्यांची पत्नी सौ साधना भोसले यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्य पाहिले आहे, आणि ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी मध्ये ते सामील झाले आहेत त्याच आघाडीतील नेते मंडळी विकास काय केला? यावरून टीका करीत आहेत, साधी गोष्ट आहे नगरपालिका जरी परिचारक गटाच्या ताब्यात असली तरीही विकासकामे ही नगराध्यक्ष करीत असतात, मग दोन वेळा संधी मिळूनही तुम्हीच शहराचा विकास करू शकला नाही, हेच यावरून सिद्ध होते,

रविवारी भालके यांनी प्रचाराचा शुभारंभ करत शक्ती प्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न केला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली पण जनतेला कोण नगराध्यक्ष होते हे लक्षात आहे, त्यामुळे विरोधकांचा 

डाव त्यांच्यावरच उलटला असून नागरीक हीच चर्चा करत आहेत.

ही गोष्ट अत्यंत हास्यास्पद असून मोठा विरोधाभास दिसून येत आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत शहराचे रूप पालटले असून 

शहर व उपनगरात मोठे रस्ते झाले आहेत प्रदक्षिणा मार्ग मास्टरप्लान करून भव्य आणि रुंद करण्यात आला आहे.

शहर जास्तीत जास्त स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न असतो.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.